AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक : एमजीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागातील वातानुकूलित यंत्रणा बंद; आरोग्य विभागाकडून रुग्णालयाला नोटीस

जे गंभीर आजाराने त्रस्त रूग्ण आहेत त्यांच्यासाठी अतिदक्षता विभाग (आयसीयू) तयार करण्यात आला आहे. तर या सुसज्ज अशा अतिदक्षता विभागाला वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे.

धक्कादायक : एमजीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागातील वातानुकूलित यंत्रणा बंद; आरोग्य विभागाकडून रुग्णालयाला नोटीस
कामोठे एमजीएम रुग्णालयImage Credit source: tv9
aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Jun 09, 2022 | 9:08 PM
Share

पनवेल : कामोठे एमजीएम रुग्णालय (Kamothe MGM Hospital) वरचेवर चर्चेत असते. याच्या आधी हे रूग्णालय एका इंजेक्शननेच एका बालकाच्या मृत्यूमुळे बातम्यांमध्ये आले होते. तर याच्याआधी कोरोना काळात येथून एक कोरोनाबाधीत पळून गेला होता. त्यावेळी कामोठे एमजीएम रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. आता ही असाच कामोठे एमजीएम रुग्णालयाचा आंधळा कारभार समोर आला असून अनेक रूग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागला आहे. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील (Intensive Care Unit) वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागला आहे. याबाबत पनवेल महापालिकेच्या (Panvel Municipal Corporation) आरोग्य विभागाकडून एमजीएम रुग्णालयास नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच खुलासा मागितला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. तर आजाराच्या प्रकाराप्रकाराने वेगवेगळे विभाग येथे तयार करण्यात आले आहेत. तर जे गंभीर आजाराने त्रस्त रूग्ण आहेत त्यांच्यासाठी अतिदक्षता विभाग (आयसीयू) तयार करण्यात आला आहे.

तर या सुसज्ज अशा अतिदक्षता विभागाला वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. जी कायमस्‍वरूपी कार्यान्वित असणे आवश्यक असते. मात्र ती बंद असल्याचे पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसून आले आहे. पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी 13 मे रोजी पाहणी केली होती. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला होता. तर यावेळी दाखल रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचेही समोर आले होते. याप्रकरणी महापालिका आरोग्य विभागाने रुग्णालय प्रशासनास नोटीस बजावली असून खुलासा मागितला आहे.

Follow Us
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा