डोंबिवली-नवी मुंबई प्रवास 15 मिनिटांत पूर्ण होणार; ऐरोली-काटई उन्नत मार्गाबाबत महत्त्वाची अपडेट समोर
डोंबिवली-नवी मुंबई प्रवास 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. हा प्रवास सोपा करणाऱ्या ऐरोली-काटई उन्नत मार्गाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आला आहे.

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पाबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग 4 असा पहिला टप्पा व ठाणे-बेलापूर या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम महिनाभरापूर्वीच पूर्ण झालंय. या दोन्ही टप्प्यांचं सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. आता या मार्गाचे ऑक्टोबरच्या अखेरीस ही वाहतूक सेवा होण्याची शक्यता आहे. यासाठी ‘एमएमआरडीए’कडून तयारी सुरू आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ऑक्टोबरच्या अखेरच्या टप्प्यात हा उन्नत मार्ग सुरू झाल्यास ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड प्रवास अतिजलद होणार आहे. यामुळे प्रवासी-वाहनचालकांची कोंडीतून सुटका होणार आहे. या मार्गाचे तिसऱ्या मार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी ऑक्टोबर 2028 उजाडण्याची शक्यता आहे. या मार्गामुळे डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवासाच्या कालावधीसाठी 30 ते 45 मिनिटे कमी होणार असून हे अंतर 15 मिनिटांवर येणार आहे. ऑगस्टच्या अखेरीस एमएमआरडीएकडून दोन्ही टप्प्याचे बांधकाम 100 टक्के पूर्ण झालं. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आथा या मार्गाच्या नामफलक, दिशादर्शक फलक लावण्याच्या कामास सुरुवात केली आहे. या आठवडाभरात ही कामे पूर्ण होतील. त्यानंतर हे टप्पे वाहतूक सेवेत दाखल केले जातील, असे सूत्रांनी सांगितलं.
तिसऱ्या टप्प्यासाठी थांबावे लागणार एक वर्ष
पहिला व दुसरा टप्पा सेवेत दाखल होईल. हे टप्पे मुलुंड-ऐरोली पूल व मुंब्रा येथे जोडले जाईल. तर या मार्गाचे 6.71 किमीच्या तिसऱ्या टप्प्याचे काम नुकतेच सुरू झालं आहे. तिसरा टप्पा हा राष्ट्रीय महामार्ग 04 ते काटई नाका असा असणार आहे. तर ती-तीन मार्गिकांच्या मुख्य मार्गिकांच्या मुख्य व्हायडक्टसह एका सेवा रस्त्याचा समावेश करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. हा टप्पा ऑक्टोबर 2028 पर्यंत पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल, अशी माहिती हाती आली आहे. नव्या मार्गाने वाहनधारकांचा वेळ वाचणार आहे. परंतु वाहनधारकांना काही महिन्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यासाठी एक वर्ष थांबावे लागणार आहे.
