AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्यात अजितदादांनी गेम फिरवला, काँग्रेसला सर्वात मोठा हादरा, हजारो कार्यकर्त्यांसह बड्या महिला नेत्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला असून, काँग्रेस नेत्या आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

मोठी बातमी! राज्यात अजितदादांनी गेम फिरवला, काँग्रेसला सर्वात मोठा हादरा, हजारो कार्यकर्त्यांसह बड्या महिला नेत्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश
| Updated on: Aug 13, 2025 | 4:01 PM
Share

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत, अनेक दिग्गज नेत्यांंनी महाविकास आघाडीची साथ सोडली असून, महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. सध्या शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तीनही पक्षात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पाहयला मिळत आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वारज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्या आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं समोर आलं आहे.  वीस ते पंचवीस हजार कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती प्रतिभा शिंदे यांनी दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या शिंदे? 

ज्या आशा आणि अपेक्षा घेऊन काँग्रेसमध्ये गेले होते, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचं प्रतिभा शिंदे यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,  जळगाव जिल्ह्यात बैठकांना बोलावलं जात नव्हतं, पद असून काम करू दिलं जात नसल्याने जिल्हा नव्हे राज्य पातळीवर नाराजी होती. मला पक्षात घेऊन पद दिले, काम करण्याची संधी दिली याबद्दल मी राहुल गांधी यांचे आभार मानते.  17 ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर उपमुख्यमंत्री अजित  यांच्या उपस्थितीमध्ये वीस हजारांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान  काम करण्यासाठी पदाची आवश्यकता असते, त्यामुळे राष्ट्रवादीत पद मिळावे अशी अपेक्षाही यावेळी प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केली आहे. अजितदादांनी तसा आपल्याला शब्द दिल्याचंही यावेळी प्रतिभा शिंदे यांनी म्हटलं, हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा