Ajit Pawar : सत्तेत येण्यासाठी दबाव होता पण कशाचा?, अजित पवार यांनी स्पष्टचं सांगितलं

आमच्यावर दबाव असल्याचा आरोप केला जातो. पण, तो दबाव हा लोकांची कामं करण्यासाठी होता. टीका करणारे टीका करतात. आम्ही लोकहिताची काम करण्यापासून बाजूला हटणार नाही, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

Ajit Pawar : सत्तेत येण्यासाठी दबाव होता पण कशाचा?, अजित पवार यांनी स्पष्टचं सांगितलं
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 8:45 PM

भूषण पाटील, प्रतिनिधी, कोल्हापूर, १० सप्टेंबर २०२३ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात उत्तरदायित्व सभा घेतली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी मोठा खुलासा केला. अजित पवार म्हणाले, आमची बदनामी करण्याचे काम चाललंय. त्यात काही तत्थ्य नाही. महाराष्ट्राला माहीत आहे. मी जे बोलतो ते खरं बोलतो. वस्तुस्थितीला धरून बोलतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या कृतीतून पुढं जाण्याचा प्रयत्न करतो. राज्याची कायदा, सुव्यवस्था चांगली राहावी. राज्यातील जनतेने गुण्यागोविंदाने राहावे, यासाठी सत्तेत येण्याचा निर्णय घेतला.

आम्ही मराठ्यांची औलाद

अजित पवार यांनी अशी भूमिका का घेतली असा प्रश्न अनेकांना पडला. काही जण म्हणाले दबाव होता. होय, आमच्यावर दबाव होता लोकांची काम करायचा. आम्ही दाबवाला भीक घालणारे लोकं नाहीत. आम्हीपण मराठ्यांची औलाद आहे. आम्हीपण शेतकऱ्यांची मुलं आहोत. मध्यंतरी आम्ही सरकारमध्ये नव्हतो. त्यामुळे काही गोष्टी करता येत नव्हत्या. भाषण करून काम होत नाहीत. त्यासाठी ठोस भूमिका घ्यावी लागते. आयटी कंपन्या येतील. असं वातावरण तयार करावं लागणार आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

लोकांची कामं करण्यासाठी महायुतीत गेलो

स्वतःचा सार्थ साधण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष महायुतीमध्ये गेला नाही. काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरी बसता येत नाही. संधी मिळाल्यावर लोकांची काम केली पाहिजेत. आमच्याबद्दल बदनामी करत होते. स्वतःचा सार्थ साधण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष महायुतीमध्ये गेला नाही, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

तर राजकारणातून निवृत्त होईन

लोककल्याणकारी योजना शेवट्या माणसासाठी राबवल्या पाहिजे. लोकहिताची कामं करण्यासाठी महायुतीत आलो आहोत. काही लोकं आमची बदनामी करतात. उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळल्यावर आम्ही महायुतीमध्ये सहभागी होण्याचं पत्र दिलं. हे जर खरं नसेल तर मी राजकारणातून निवृत्त होईन, असा इशारा अजित पवार यांनी दिला. टीका करणारे टीका करतील. पण, मी माझ्या लोकहिताच्या कामापासून बाजूला हटणार नाही, असंही अजित पवार यांनी म्हंटलं.

'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.