Ajit Pawar Maharashtra Deputy CM : निवडणूका कोणत्या चिन्हावर लढवणार? या प्रश्नावर अजीत पवार यांनी दिलं रोखठोक उत्तर

सत्तेच्या बाजूने आल्यानंतर अजीत पवारांनी काही प्रश्नांवर रोखठोक मत दिले तर काही प्रश्नांची सुचक उत्तरे दिली. यामध्ये आम्ही राष्ट्रवादी पक्ष सोडून आलेलो नसून आम्ही स्वतः..

Ajit Pawar Maharashtra Deputy CM : निवडणूका कोणत्या चिन्हावर लढवणार? या प्रश्नावर अजीत पवार यांनी दिलं रोखठोक उत्तर
उपमुख्यमंत्री अजीत पवार
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 02, 2023 | 5:41 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणात आज आणखी एक भुकंप अनुभवायला मिळाला. राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार (Ajit Pawar Maharashtra Deputy CM) यांनी भाजप आणि शिवसेनेची कास धरत सत्तेच्या बाजूने आले. तब्बल 40 पेक्षा जास्त आमदारांची त्यांना साथ अल्याचा दावा करण्यात येत आहे. अजीत पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ आणि नव नियुक्त कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी देखील अजीत पवारांच्या भूमीकेला समर्थन दिल्यामुळे या नाट्यांतरामागचा खरा चाणाक्य कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान आगामी निवडणूकी बाबत अजीत पवारांनी त्यांचे रोखठोक मत व्यक्त केले आहे.

निवडणूकींबद्दल अजीत पवारांचे मत

सत्तेच्या बाजूने आल्यानंतर अजीत पवारांनी काही प्रश्नांवर रोखठोक मत दिले तर काही प्रश्नांची सुचक उत्तरे दिली. यामध्ये आम्ही राष्ट्रवादी पक्ष सोडून आलेलो नसून आम्ही स्वतः पक्ष म्हणून सामील झालो असल्याचे अजीत पवार म्हणाले. विरोधात असतांना आम्ही मोदींवर टिका केल्या मात्र मोदींचे सक्षम नेतृत्त्व नाकारता येणे शक्य नसल्याचेही ते म्हणाले. आगामी निवडणूका भाजप सोबत विकासाच्या मुद्यावर लढवणार असल्याचे ही ते म्हणाले. या सोबतच राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ या चिन्हावरच आगामी येणाऱ्या निवडणूका लढवणार असल्याची स्पष्ट भूमीका अजीत पवार यांनी मांडली.

शरद पवार यांचा त्यांच्या निर्णयाला पाठींबा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर, आमच्या निर्णयाला सगळ्यांचा आशीर्वाद असल्याचे सुचक वक्तव्य अजीत पवार यांनी केले आहे. याशीवाय संपूर्ण पक्ष आमच्या सोबत असल्याचेही ते म्हणाले. या वेळी त्यांनी कोणावरही आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा विकासाचा मुद्दा समोर केला.

राज्याला नवा मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता- संजय राऊत

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संदय राऊत यांनी राजकीय घडामोडीवर आपली प्रतिक्रीया दिली आहे. हा कुठलाही भुकंप नाही. असं काहीतरी होणार याची सगळ्यांनाच कल्पना होती. असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. याशिवाय राज्याला नवे मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.