AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा पोलीस बंदोबस्त, चाहत्यांची गर्दी, 32 वर्षांपूर्वी मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर ऐश्वर्या रायचं सौंदर्य…Video व्हायरल

प्रचंड मोठा चाहता वर्ग. एअरपोर्टवर मोठा पोलीस बंदोबस्त. 32 वर्षांपूर्वी ऐश्वर्या रायचा मिस वर्ल्ड जिंकल्यानंतरचा व्हिडीओ तुफान व्हायरल. सौंदर्य पाहून म्हणाल....

मोठा पोलीस बंदोबस्त, चाहत्यांची गर्दी, 32 वर्षांपूर्वी मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर ऐश्वर्या रायचं सौंदर्य...Video व्हायरल
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 05, 2026 | 4:50 PM
Share

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन या नावाला आज जागतिक स्तरावर वेगळी ओळख आहे. मॉडेलिंगच्या रॅम्पपासून ते चित्रपटसृष्टीच्या भव्य मंचापर्यंत ऐश्वर्याने अत्यंत यशस्वी आणि प्रेरणादायी कारकीर्द घडवली आहे. आजही ती चित्रपटांमध्ये सक्रिय आहे आणि कान्स फिल्म फेस्टिव्हल, पॅरिस फॅशन वीक यांसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपल्या सौंदर्याचा आणि आत्मविश्वासाचा ठसा उमटवत आहे.

मात्र, तिच्या या यशस्वी प्रवासाची सुरुवात झाली ती 1994 साली मिस वर्ल्डचा मुकुट जिंकून. या विजयाने ऐश्वर्याने केवळ स्वतःचं नाही तर संपूर्ण देशाचं नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केलं.

28 वर्षांनंतर भारताला मिळालेला मिस वर्ल्डचा मुकुट

भारताला पहिली मिस वर्ल्ड 1966 साली रीता फारिया यांच्या रूपाने मिळाली होती. त्यानंतर तब्बल 28 वर्षांचा दुष्काळ संपवत ऐश्वर्या रायने देशाला दुसरा मिस वर्ल्डचा ताज मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी येथे झालेल्या या स्पर्धेत अवघ्या 21 व्या वर्षी ऐश्वर्याने हा ऐतिहासिक विजय मिळवला.

मिस वर्ल्डचा मुकुट जिंकून ऐश्वर्या भारतात परतली तेव्हा तिचं स्वागत एखाद्या राष्ट्रीय नायिकेसारखंच करण्यात आलं होतं. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका जुन्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या या ऐतिहासिक आगमनाची झलक पाहायला मिळत आहे.

एअरपोर्टवर तिचं स्वागत करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी, पोलीस बंदोबस्त आणि मोठ्या प्रमाणावर चाहत्यांची गर्दी जमली होती. एअरपोर्टच्या बाहेर ऐश्वर्याची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. कारमध्ये बसण्याआधी ऐश्वर्याने देशवासियांना नम्र अभिवादन केलं, आपल्या खास स्मितहास्यासह फ्लाइंग किस दिला.

2025 चा मिस वर्ल्ड थोडक्यात हुकला

हा व्हिडीओ पाहून ऐश्वर्याचे चाहते पुन्हा एकदा 90 च्या दशकात रमले आहेत. सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, अनेक जण तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या साधेपणाचंही भरभरून कौतुक करत आहेत.

अलीकडे झालेल्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेत भारताकडून राजस्थानची नंदिनी गुप्ता सहभागी झाली होती. तिने टॉप 20 मध्ये स्थान मिळवलं, मात्र अंतिम फेरीपूर्वीच तिचा प्रवास थांबला. 2025 चा मिस वर्ल्डचा मुकुट थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगश्री हिने पटकावला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...