Parth Pawar Land Scam : 1 टक्के शेअर असलेल्या पार्टनवर गुन्हा, मग पार्थ पवारांवर का नाही? शीतल तेजवानी कोण? त्यांना अटक होणं का गरजेचं? VIDEO

Parth Pawar Land Scam : पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत आले आहेत. कारण यात अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार यांचा थेट संबंध आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शीतल तेजवानींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Parth Pawar Land Scam : 1 टक्के शेअर असलेल्या पार्टनवर गुन्हा, मग पार्थ पवारांवर का नाही? शीतल तेजवानी कोण? त्यांना अटक होणं का गरजेचं? VIDEO
Parth Pawar-Shital Tejwani
| Updated on: Nov 07, 2025 | 10:13 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुण्यातील जमीन खरेदीच प्रकरण गाजत आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांचं नाव आलं आहे. पुण्यातील ही मोक्याची जाग पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला 300 कोटी रुपयात कशी मिळाली? हा मुख्य प्रश्न आहे. बाजारभावानुसार या जमिनीच मूल्य 1800 कोटी रुपये आहे. या जमिनीच्या खरेदी व्यवहारात मुद्रांक शुल्क म्हणजे स्टँप ड्युटी म्हणून 500 रुपये भरले असा आरोप केला जातोय. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र अडचणीत आलेल्या जमीन व्यवहारात तिघांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र, पार्थ पवार यांच्याविरोधात अजून गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे पार्थ पवार यांना क्लीनचीट दिली जातेय का? असा प्रश्न विचारला जातोय.

या जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारुंवर गुन्हा दाखल झाला आहे. पार्थ पवार कंपनीचे भागीदार आहेत. पण त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल झालेला नाही. अमेडिया कंपनीत दिग्विजय पाटील हे पार्थ पवार यांचे भागीदार असल्याच म्हटलं जातय. त्यांच्या नावावर 1 टक्के शेअर्स असल्याचं बोललं जात. दिग्विजय पाटलांवर गुन्हा पण पार्थ पवारांवर नाही म्हणून शंका निर्माण झालीय.

जागेची पावर ऑफ अॅटर्नी कोणाकडे होती?

शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारु तिघांवर मुद्रांक शुल्कात फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रकरणात सहभाग असतानाही प्रशासनाकडून पार्थ पवारांविरोधात तक्रार का नाही?. कंपनीने 6 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही अशी पोलिसांची माहिती आहे. शीतल तेजवानी यांच्याकडे संबंधित जागेची पावर ऑफ अॅटर्नी आहे. जमीन खरेदीखत शीतल तेजवानीने लिहून दिलं. अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांनी ते लिहून घेतलं. उपनिबंधक रवींद्र तारु यांनी कागदपत्र तयार करुन दिली.

तक्रारीत पार्थ पवार यांचं नाव का नाही ?

दस्त नोदंणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तीन जणांवर गुन्हा दाखल झालाय. पार्थ पवारांच्या चौकशीनतंर सगळया गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. तक्रारीत पार्थ पवार यांचं नाव का नाही ? त्यावर अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘आमच्या दस्तावर ज्या पार्टी आहेत, ज्यांची नावं टाकून सह्या आहेत, त्यांच्याविरुद्ध तक्रार केलीय’

शितलचा शोध घेण्याचं आव्हान

शीतल तेजवानीचा आता बावधन पोलिसांकडून शोध सुरु आहे. शीतलने जमीन व्यवहारासाठी वापरलेल्या कुलमुखत्यार पत्रासाठी जो पत्ता वापरला, त्या परामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सध्या टाळे आहे. त्यामुळं बावधन पोलिसांसमोर शितलचा शोध घेण्याचं आव्हान असेल. शीतलच्या अटकेनंतर पार्थ पवारांचा या प्रकरणातील रोल समोर येऊ शकतो.