अकोल्यातील सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.सलामपुरीया यांचा कोरोनामुळे मृत्यू

विदर्भातील प्रख्यात प्लास्टीक सर्जन डॉ. नंदकिशोर सलामपुरीया यांचे आज 12 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास उपचार सुरु असतांना निधन झाले (Akola Famous Doctor Salampuriya Death due to Corona)

  • गणेश सोनोने, टीव्ही 9 मराठी, अकोला
  • Published On - 23:05 PM, 12 Jan 2021

अकोला : विदर्भातील प्रख्यात प्लास्टीक सर्जन डॉ. नंदकिशोर सलामपुरीया यांचे आज 12 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास उपचार सुरु असतांना निधन झाले. डॉ. सलामपुरीया यांच्या निधनाचे वृत्त कळताच शहरातील वैद्यकीय क्षेत्रासोबतच अग्रवाल आणि मारवाडी समाजात शोककळा पसरली. डॉ. सलामपुरीया यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने, त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना अकोल्याच्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं (Akola Famous Doctor Salampuriya Death due to Corona).

डॉ. सलामपुरीया यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवू लागली होती. पण 4 ते 5 दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा ढासळू लागली. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने उपचारामध्ये प्रतिसाद मिळू शकला नाही. अखेर आज सायंकाळी वयाच्या 65 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. शारदा सलामपुरीया आणि दोन मुली असून डॉ. के.के. अग्रवाल यांचे ते बहिण जावाई होते. करोना दिशा निर्देशानुसार त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथील मुळचे रहिवासी असलेले डॉ. सलामपुरीया यांनी अकोला जिल्ह्याला आपली कर्मभूमी मानत या ठिकाणी प्लास्टीक सर्जरी आणि जळीत रुग्णांच्या सेवेतून वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. श्रीराम हॉस्पिटल हे अकोलाच नव्हे तर पश्चिम विदर्भात जळीत रुग्णांवरील उपचारासाठी नावलौकीक रुग्णालय आहे. डॉ.सलामपुरीया यांचा सालस स्वभाव आणि रुग्णांवर योग्य उपचार यामुळे वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे वेगळेच स्थान होते. डॉ सलामपुरीया यांच्या मृत्यू ने अग्रवाल – मारवाडी समाज आणि वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे (Akola Famous Doctor Salampuriya Death due to Corona).

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर