अमोल मिटकरींचं ‘स्टिंग ऑपरेशन’… रडारवर कोण?; काय आढळलं?

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील एका महिला वसतिगृहावर स्टिंग ऑपरेशन केले. त्यांना वसतिगृहात अस्वच्छता, झुरळे आणि भाजीपाला उघडा ठेवल्याचे आढळले. यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे आणि मिटकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर मंत्रालयात तक्रार दाखल केली आहे.

अमोल मिटकरींचं स्टिंग ऑपरेशन... रडारवर कोण?; काय आढळलं?
अमोल मिटकरींचं 'स्टिंग ऑपरेशन'
| Updated on: Feb 24, 2025 | 10:18 AM

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात एक स्टिंग ऑपरेशन केलं आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये मिटकरी यांना धक्कादायक गोष्टी आढळल्या आहेत. मिटकरी यांच्या या स्टिंग ऑपरेशनमुळे अधिकाऱ्यांची एकच पळापळ उडाली. मिटकरी यांनी एका वसतिगृहात हे स्टिंग ऑपरेशन केलं. यावेळी त्यांना स्वयंपाक घरात अस्वच्छता आढळली. स्वयंपाक घरात झुरळं फिरत होती. भाजीपाला उघडाच ठेवला होता. हा सर्व प्रकार पाहून मिटकरी चांगलेच संतापले. त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी अकोल्यात केलेल्या एका ‘स्टिंग ऑपरेशन’ची चांगलीच चर्चा आहे. अकोल्यातल्या खडकी भागात असलेल्या महिला व बाल वस्तीगृहाला मिटकरी यांनी अचानक भेट दिली. या ठिकाणी पोलीस कोठडीमध्ये असलेल्या महिला-मुली, अनाथ मुली, सहारा नसलेल्या महिलांची व्यवस्था करण्यात येते. मिटकरींच्या या स्टिंगमध्ये या वस्तीगृहातील मोठी अनियमितता समोर आली आहे. तर मिटकरींनी येथील कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले असून मिटकरींच्या या अचानक भेटीमुळे वस्तीगृहांच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती.

अधिकाऱ्यांची पळापळ

अकोला शहरातल्या खडकी भागातल्या महीला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या वस्तीगृहाला आमदार अमोल मिटकरी यांनी काल सायंकाळच्या सुमारास अचानक भेट दिली. तर मिटकरींच्या अचानकपणे भेट दिल्यानंतर स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. तर पोलीस कस्टडी, अनाथ मुली, किंवा कोणत्याही प्रकारच्या सहारा नसलेल्या महिला या वस्तीगृहात राहतात. मात्र मिटकरींच्या भेटीनंतर वस्तीगृहाचा मोठा भोंगळ कारभार समोर आला आहे.

थेट मंत्रालयात तक्रार

सरकार हे वसतिगृह चालवणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात निधी देत असते. परंतु आमदार मिटकरी यांनी अकोल्यातल्या खडकी भागात असणाऱ्या वसतिगृहाला भेट दिल्यानंतर अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कर्तव्यप्रती त्रुट्या दिसून आल्या आहेत. तर वसतिगृहात अनेक ठिकाणी अस्वच्छता होती. तर वसतिगृहाच्या स्वयंपाक घरात चक्क झुरळ फिरताना दिसून आलेत.. तर दैनंदिन लागणार भाजीपाला बेसिनमध्ये ठेवल्याचे निदर्शनास आलं. अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणाचा मिटकरींनी चांगलाचा समाचार घेतला असून संबंधित अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची तक्रार मंत्रालय स्तरावर करण्यात आल्याचं समजते. या कारवाईमुळे आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे शासनाच्या चांगलीच धावपळ उडाली आहे.