आता पक्षाचे आठही खासदार…, विलिनीकरणासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटातून मोठी बातमी, नेमकं काय ठरलं?

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यानंतर ही चर्चा सुरू झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.

आता पक्षाचे आठही खासदार..., विलिनीकरणासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटातून मोठी बातमी, नेमकं काय ठरलं?
विलिनीकरणासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 23, 2026 | 7:15 PM

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्य करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये देखील चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती.

एकीकडे हे सर्व सुरू असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. त्यामुळे विलिनीकरणाबाबत अनेक तर्क लावण्यात येत होते. मात्र विलिनीकरण होणार नसल्याचं स्पष्ट करत सुप्रिया सुळे यांनी या सर्व चर्चांवर पडदा टाकला. या सर्व पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी मोठा दावा केला आहे.

Loading...

नेमकं काय म्हणाले शिंदे? 

​राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा विषय सध्या थांबलेला असून, कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे नेते शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेनंतर या विषयावर पुन्हा चर्चा करणे योग्य नसल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. पक्षाचे सर्व आठही खासदार एकत्रितपणे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत काम करत असून, खासदार पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या केवळ वावड्या असल्याचंही त्यांनी यावेळी  नमूद केले. निलेश लंके, अमोल कोल्हे यांच्यासह बीड आणि नाशिकच्या खासदारांच्या आम्ही संपर्कात असून, सर्वजण पक्षाशी समन्वय साधून आहेत, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला आहे. दरम्यान यामुळे आता पुन्हा एकदा विलिनीकरण होणार नसल्याचं यामुळे स्पष्ट झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विलिनीकरणासंदरर्भात चर्चा सुरूच आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us