AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TCS : 5 वेळा नमाज पठण, मिटिंग हॉल बनला प्रार्थना स्थळ, TCS कर्मचाऱ्याकडून कंपनीच्या आतलं भीषण वास्तव उघड

TCS : "70 टक्के हिंदू असताना एकाच धर्माचं प्रबोधन का करतात?. आयटी कंपन्यांमध्ये पॉश युनिट अतिशय प्रभावी काम करत. पण त्यांच्याकडे तक्रार जाणं गरजेचं आहे. पण जर त्या कमिटीमध्ये हिंदूविरोधी कोणी असेल तर प्रकरण दाबलं जाऊ शकतं. पण पॉश हा कायदा खूप कडक आहे"

TCS : 5 वेळा नमाज पठण, मिटिंग हॉल बनला प्रार्थना स्थळ, TCS कर्मचाऱ्याकडून कंपनीच्या आतलं भीषण वास्तव उघड
IT EmployeeImage Credit source: Getty Images
| Edited By: | Updated on: Apr 15, 2026 | 1:16 PM
Share

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात नाशिकच्या आयटी कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण तसचं त्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचं प्रकरण गाजत आहे. अख्खा महाराष्ट्र या घटनेने हादरला आहे. मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या तरूणींना चांगल्या करिअरचं स्वप्न दाखवत, त्यांच्याशी अश्लील वर्तन करण्यात आलं. आता TCS मधील एक कर्मचारी समोर येऊन टीव्ही 9 मराठीशी या मुद्यावर एक्सक्लुझिव्ह बोलला आहे. त्याने कंपनीतील वास्तव सांगितलं आहे. “गेल्या 25 वर्षांपासून या क्षेत्रात मी काम करतोय. विदेशी कंपन्यांमध्ये मी काम केलंय. रमजानमध्ये हे लोकं 5 वेळेस नमाज पढतात. अतिशय उर्मटपणे वागून अक्षरशः मिटिंगमधून उठून जातात. वॉशबेसिनमध्ये पाय धुतात. आमच्या मिटिंग हॉलला प्रार्थना स्थळ बनवलेलं आहे. यावर लक्ष दिलं जात नाही. त्यांचा तो सगळा अवतार बघून भीती वाटते” असं TCS या प्रसिद्ध IT कंपनीतील कर्मचाऱ्याने टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

“ते लोकं आपल्याला तुच्छ समजतात. त्यांना कसलीही लाज वाटत नाही. ते त्यांचा धर्म पाळतात. हे सर्व बघून धक्का बसतो” असं या टीसीएसमधील कर्मचाऱ्याने सांगितलं. “याच्या विरुद्ध आवाज कसा उठवणार? हा आयटी क्षेत्रातील सामान्य कर्मचाऱ्याला धाक बसलेला असतो. वरिष्ठांशी संगनमत आहे असं नाही पण या लोकांची मुजोरी आहे. कितीही महत्वाचं काम असलं तरी हे लोकं येत नाहीत. त्यांची ही मुजोरी मोडून काढण्यासाठी आयटी कंपन्यांनी काहीतरी कठोर पावले उचलायला हवी. त्याचबरोबर हिंदूंमध्ये प्रबोधन होणं गरजेचं आहे” असं या TCS कर्मचाऱ्याने सांगितलं.

‘पण या लोकांची मुजोरी आहे हे नक्की’

“कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी हे प्रबोधन गरजेचं आहे. TCS मध्ये चांगले नियम आहेत. पण या लोकांची मुजोरी आहे हे नक्की. TCS ची जोड आहे असं म्हणू शकत नाही. इस्लाम धर्मियांच्या मुजोरीमुळे ही घटना घडलेली असावी. काही आयटी कंपन्यांमध्ये पेहराव काय असावा याची लिस्ट असते. फ्रान्सच्या एक कंपनीने हिजाबचा फोटो होता. पण भारतीय पेहराव नव्हता. आम्ही मेल केल्यानंतर 8 दिवसांनी त्या ड्रेसकोडमधून हिजाबचा फोटो काढला” असं या कर्मचाऱ्याने सांगितलं.

‘हिंदूविरोधी कोणी असेल तर प्रकरण दाबलं जाऊ शकतं’

“70 टक्के हिंदू असताना एकाच धर्माचं प्रबोधन का करतात?. आयटी कंपन्यांमध्ये पॉश युनिट अतिशय प्रभावी काम करत. पण त्यांच्याकडे तक्रार जाणं गरजेचं आहे. पण जर त्या कमिटीमध्ये हिंदूविरोधी कोणी असेल तर प्रकरण दाबलं जाऊ शकतं. पण पॉश हा कायदा खूप कडक आहे. या गोष्टींना अटकाव करण्यासाठी अतिशय कडक पावलं उचलणं गरजेचं आहे. याबाबत हिंदूंनी जागरूक व्हावं. मुसलमानांनी देखील असं कृत्य करू नये” असं हा टिसीएस कर्मचारी म्हणाला. “मानवता हा धर्म आहे. धर्मांतराची सक्ती करू नये आणि खपवून पण घेऊ नये. यावर आवाज उचलणं जास्त गरजेचं आहे” असं हा कर्मचारी म्हणाला.

Follow Us
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर