महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहंची महत्वाची सूचना
mahayuti politics : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांना अमित शहा यांनी महत्वाची सूचना दिल्या आहेत. चव्हाण यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

काही दिवसांपूर्वी राज्यात पाच जागांवर झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली. महाविकास आघाडीने पाच पैकी तीन जागा जिंकल्या. तर महायुतीला फक्त 2 जागांवर समाधान मानावे लागले. दोन्ही शिक्षक मतदारसंघात भाजपने विजय मिळवला. परंतु इतर तीन जागांवर महायुतीमधील मतभेदाचा फटका बसल्याचे बोलले जात आहे. विधानपरिषदेच्या निकालानंतर महाविकास आघाडीची आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले. विधानपरिषदेच्या या निकालाची भाजपच्या वरिष्ठांपर्यंत चर्चा गेली. या निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विधानपरिषद निवडणुकीतील कामाचा अहवाल देखील सादर केला. महायुती अभेद्य ठेवण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या निवडणुकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविंद्र चव्हाण यांना महत्वाच्या सूचना केल्या. महाविकास आघाडीच्या नॅरेटीव्हला खोडून काढा. विरोधकांना जशास तसे उत्तर द्या, महायुती म्हणून विरोधकांना पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर द्या, अशा सूचना अमित शहा यांनी रवींद्र चव्हाण यांना केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रविंद्र चव्हाण यांच्या भेटीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान महायुतीत काय घडलं होतं?
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. निवडणुकीआधी शिंदे गट आणि भाजपमध्ये तिकीटावरून रस्सीखेच झाली. पुण्यातील शिक्षक मतदारसंघात शिंदे गट आणि भाजपनेही उमेदवार दिली होती. या मतभेदाचा फटका पुण्यातील शिक्षक आणि पदवीधरमध्ये दिसून आला. पुण्यातील शिक्षक मतदारसंघात भाजपने विजय मिळवला. परंतु पदवीधरमध्ये भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. तर मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघातही अजित पवार गटाच्या तत्कालीन विद्यमान आमदाराला पराभवाचा सामना करावा लागला. विधानपरिषदेच्या निकालानंतर भाजपच्या नवनाथ बन यांनी शिंदे गटावर आगपाखड केली. विधानपरिषदेच्या महायुतीच्या कामगिरीला शिंदे गटाला जबाबदार धरलं. तर शिंदे गटाच्या रवींद्र धंगेकर यांनीही नवनाथ बन यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर भाजपच्या प्रमुख नेत्यांवरही टीका केली.