अमावस्या अन् अजितदादांच्या अपघाताचं कनेक्शन, संशयाची सुई भोंदू खरातवर, त्या ट्विटने मोठी खळबळ

नाशिकमधील भोंदू अशोक खरात याच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात तब्बल 100 हून अधिक व्हिडीओ क्लिप समोर आल्या आहेत. त्यानंतर आता अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात खरातची काही भूमिका होती का? असा संशयही काही जणांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

अमावस्या अन् अजितदादांच्या अपघाताचं कनेक्शन, संशयाची सुई भोंदू खरातवर, त्या ट्विटने मोठी खळबळ
Ashok Kharat
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 20, 2026 | 4:03 PM

नाशिक येथील भोंदू ज्योतिषी अशोक खरात सध्या चांगलाच चर्चेमध्ये आला आहे. एका महिलेनं त्याच्याविरोधात लौंगिक शोषणाची तक्रार दिली आणि या भोंदू अशोक खरात याचं बिंग फुटलं धक्कादायक म्हणजे या प्रकरणात 100 हून अधिक लैंगिक शोषणाचे व्हिडिओ समोर आले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या अपघात प्रकारणात भोंदू बाबा अशोक खरात याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी त्यांचा बारामती आणि मुंबई येथील घराबाहेर जादूटोण्याशी संबंधित वस्तू सापडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. हाच धागा पकड अमोल मिटकरी यांनी या प्रकरणात अशोक खरात याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे, अमोल मिटकरी यांनी ट्विट करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?

‘या तारखा नीट बघा. १८/१९/२० नोव्हेंबर २०२५ ! या दिवशी अनुक्रमे शिवरात्री, व अमावस्या होत्या. याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला. लिंगपिसाट भोंदू बाबा कॅ अशोक खरात ह्याचा शिवलिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेचा आहे. ह्या आश्रमात अघोरी पूजा चलायच्या ?शिवाय बाबांचे भक्त त्याच्या आदेशावरून राजकीय लाभापायी ह्या पुजा आदेश मानून करू शकतात. मी अजित दादांच्या इतक्या वर्षाच्या सहवासात एक गोष्ट अनुभवली होती दादा अजिबात कर्मकांड मानत नव्हते.अशा थोतांडाना थारा देत नव्हते. मात्र या प्रकरणात अशोक खरात चे VSR कनेक्शन उघड झाले आहे. आता प्रश्न असा आहे की २७ जानेवारीला कार ने पुण्याला जाणारे दादा २८ ला सकाळी VSR ने कुणाच्या सल्ल्यावरून गेले? या भोंदू बाबाचा कोण भक्त होता? या बाबाचे व आश्रमातील पुजाऱ्यांचे १६ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या दरम्यानचे CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला हा सगळा चित्रपट स्पष्ट होईल. गुजोबावी धुके की धोका?? अघोरी पूजा कुणाची? पाणी इथे पण मुरतांना दिसतय..’ असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

 

रोहित पवारांकडूनही चौकशीची मागणी

दरम्यान दुसरीकडे रोहित पवार यांनी देखील या प्रकरणात चौकशीची मागणी केली आहे. ‘नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदुबाबाबाला भोंदुगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरिवर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे.’ अशी मागणी रोहित पवार यांनी अमोल मिटकरी यांच्या ट्विटचा संदर्भ देऊन केली आहे.

 

Follow Us