AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: अजितदादांच्या निवासस्थानासमोर जादूटोणा? ज्योतिषी अशोक खरातचं कनेक्शन? रोहित पवारांच्या दाव्याने मोठी खळबळ

Rohit Pawar on Ashok Kharat: नाशिकचा भोंदू अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप ताजा असतानाच आता अजितदादांच्या निवासस्थानासमोर जादूटोणा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याचे ज्योतिषी अशोक खरातचं कनेक्शन असल्याचा दावा होत असल्याने खळबळ उडाली आहे.

Rohit Pawar: अजितदादांच्या निवासस्थानासमोर जादूटोणा? ज्योतिषी अशोक खरातचं कनेक्शन? रोहित पवारांच्या दाव्याने मोठी खळबळ
Ashok Kharat Rohit Pawar
| Updated on: Mar 20, 2026 | 3:00 PM
Share

Rohit Pawar on Ashok Kharat: नाशिकचा भोंदू अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याविषयीचे 100 हून अधिक व्हिडिओ असल्याची माहिती समोर येत आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भोंदू खरात याची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या गदारोळातच आता अजून एक खळबळजनक दावा करण्यात येत आहे. मध्यंतरी दिवंगत अजित पवार यांच्या घरासमोर जादूटोणा झाल्याचे समोर आले होते. त्याविषयी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे.

रोहित पवार यांचे ट्वीट चर्चेत

आमदार रोहित पवार यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात आमदार अमोल मिटकरी यांच्या ट्वीटचा संदर्भ देऊन त्यांनी खळबळजनक दावा केला आहे. “पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदुगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही, परंतु आ. अमोल जी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदुबाबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते.”

ते राजकीय राक्षस कोण?

“नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदुबाबाबाला भोंदुगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरिवर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे. सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही.” असा इशाराही रोहित पवार यांनी या ट्वीटच्या माध्यमातून दिला आहे.

अमोल मिटकरी यांच्या ट्वीटमध्ये काय?

“ह्या तारखा नीट बघा. १८/१९/२० नोव्हेंबर २०२५ ! या दिवशी अनुक्रमे शिवरात्री,व अमावस्या होत्या. याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला. लिंगपिसाट भोंदू बाबा कॅ अशोक खरात ह्याचा शिवलिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेचा आहे. ह्या आश्रमात अघोरी पूजा चलायच्या ?शिवाय बाबांचे भक्त त्याच्या आदेशावरून राजकीय लाभापायी ह्या पुजा आदेश मानून करू शकतात. मी अजित दादांच्या इतक्या वर्षाच्या सहवासात एक गोष्ट अनुभवली होती दादा अजिबात कर्मकांड मानत नव्हते.अशा थोतांडाना थारा देत नव्हते. मात्र या प्रकरणा अशोक खरात चे VSR कनेक्शन उघड झाले आहे. आता प्रश्न असा आहे की २७ जानेवारीला कार ने पुण्याला जाणारे दादा २८ ला सकाळी VSR ने कुणाच्या सल्ल्यावरून गेले ?या भोंदू बाबाचा कोण भक्त होता?या बाबाचे व आश्रमातील पुजाऱ्यांचे १६ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या दरम्यानचे CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला हा सगळा चित्रपट स्पष्ट होईल. गुजोबावी धुके की धोका?? अघोरी पूजा कुणाची? पाणी इथे पण मुरतांना दिसतंय.” असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे. यामध्ये अजितदादांच्या विमान अपघाताचे या अघोरी पूजेशी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

Follow Us
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग
हे सगळं पैशासाठी असेल तर...; पवनराजे निकालावर अंजली दमानियांचा संताप
Anjali Damania | हे सगळं पैशासाठी असेल तर...; पवनराजे निकालावर अंजली दमानियांचा संताप अनावर
एकही खासदार कुठंही जाणार नाही, कारण... शिंदे सेनेतील नेत्याने सांगितलं
Big Breaking | एकही खासदार कुठंही जाणार नाही, कारण... शिंदे सेनेतील नेत्याने सांगितलं गुपित
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; थेट अमित शाह...
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
Omraje Nimbalkar | निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात! अनिल देसाईंच्या त्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ
ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील मातोश्रीवर, राजकारणात मोठं घडणार?
Omraje Nimbalkar | ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील अचानक 'मातोश्री'वर, राजकारणात मोठं घडणार?
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
Omraje Nimbakakar | मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
दुर्दैव! हायकोर्टात जाणार... निंबाळकर निकालावर ओमराजेंची प्रतिक्रिया
दुर्दैव! हायकोर्टात जाणार...पवनराजे निंबाळकर निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर