AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat: भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट? CMO कार्यालयाकडून मोठ्या हालचाली, सूत्रांची माहिती काय?

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा दोन दिवसात राजीनामा घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. सीएमओ कार्यालयाने या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

Ashok Kharat: भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट? CMO कार्यालयाकडून मोठ्या हालचाली, सूत्रांची माहिती काय?
रुपाली चाकणकर, अशोक खरातImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 20, 2026 | 1:53 PM
Share

Nashik Bhondu Baba Ashok Kharat Case:  नाशिकचा भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तर त्याच्यासोबतचे छत्री धरलेला फोटोही समोर आला होता. त्यानंतर चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. याप्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान  या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा दोन दिवसात राजीनामा घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. सीएमओ कार्यालयाने या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

चाकणकरांचा दोन दिवसात राजीनामा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा येत्या दोन दिवसात राजीनामा घेण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. सीएमओ कार्यालयाकडून याप्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी अगोदरच IPS तेजस्विनी सातपुतेंच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे सखोल तपास करण्यात आले आहे. तर चाकणकर यांच्यावर येत्या दोन दिवसात कारवाई करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे.

चाकणकरांना तातडीने अटक करा

रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करण्याची मागणी उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. तसेच चाकणकरांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली. तर खरात आणि चाकणकर यांचे व्यावसायिक संबंध होते का, याविषयी तपास करण्याची मागणी त्यांनी केली. तर या सर्व प्रकरणात ज्यांची नावे समोर येत आहे, त्यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली. चाकणकर या तंत्रमंत्र करायच्या, त्यांनी अनामिका कापल्याचा धक्कादायक दावाही अंधारे यांनी केला आहे.

लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ

भोंदू अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये IPS तेजस्विनी सातपुतें यांच्या अध्यक्षतेखाली SIT अधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीतील पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे. खरातची झाडाझडती सुरू असून त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आता याप्रकरणात सरकार कुणा कुणाला अटक करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी