शिवसेना ठाकरे गटाला अत्यंत मोठा धक्का, जिल्हाप्रमुखांनी थेट दिला राजीनामा, शिंदेंच्या सेनेसोबत..

शिवसेना उद्धव ठाकरे गटाला अत्यंत मोठा धक्का बसलाय. थेट जिल्हाप्रमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अमरावतीमध्ये मोठी खळबळ उडाली. शिवसेना एकनाथ शिंदे गटात ते प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतंय.

शिवसेना ठाकरे गटाला अत्यंत मोठा धक्का, जिल्हाप्रमुखांनी थेट दिला राजीनामा, शिंदेंच्या सेनेसोबत..
Uddhav Thackeray
| Updated on: Jun 04, 2026 | 2:15 PM

राज्यात विधान परिषद निवडणुकीकरिता अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील बडे नेते बंडखोरांची समजूत काढत आहेत. 17 ही जागा बिनविरोध व्हाव्यात, ही महायुतीची इच्छा आहे. आज 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याकरिता वेळ आहे. त्यापूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. नेत्यांनी आपली कस लावली. नाराजीनाट्य दूर केले जात आहे. अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक होण्याचे चिन्ह असतानाच आता अमरावतीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला. अमरावती जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता नरेंद्र पडोळे बच्चू कडू यांच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेचे काम करणार आहेत. नरेंद्र पडोळे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा अत्यंत मोठा झटका नक्कीच उद्धव ठाकरे गटाला म्हणावा लागणार आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे राजीनामा दिल्याची चर्चा आहे. हा अमरावतीमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का म्हणावा लागेल.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठी घरघर लागली आहे. अनेक कार्यकर्त्ये सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत किंवा भाजपात जात आहेत. त्यामध्येच आता अमरावतीमध्येही मोठा झटका बसलाय. अमरावतीमध्ये आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढणार हे स्पष्टच आहे.

बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, त्यावेळी या भागात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढणार असल्याची चर्चा होती. आता तेच खरे होताना दिसत आहे. शिवाय बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ज्यावेळी प्रवेश केला, त्यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. लवकरच बच्चू कडूंच्या नेतृत्वात शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पडोळे प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर राजीनामाचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती.

पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून नरेंद्र पडोळे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगतंय. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच अमरावतीत ठाकरे गटाला मोठा धक्का आहे. नरेंद्र पडोळे यांच्याकडे अचलपूर ,मेळघाट विधानसभा क्षेत्राची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी होती. बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे
पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us