AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Gaikwad: माझ्या मतदारसंघात 50 हजार बोगस मतदार; संजय गायकवाड यांच्या विधानाने खळबळ

Sanjay Gaikwad: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या मतदार संघातील जवळपास 50 हजार बोगस मतदार असल्याचे सांगितले आहे. तसेच निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे करत असलेले काम योग्य आहे असे देखील म्हटले.

Sanjay Gaikwad: माझ्या मतदारसंघात 50 हजार बोगस मतदार; संजय गायकवाड यांच्या विधानाने खळबळ
sanjay gaikwadImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 8:11 AM
Share

बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकताच केलेल्या एका विधानाने खळबळ माजली आहे. त्यांनी सांगितले की त्यांच्या मतदार संघात जवळपास 50 हजार बोगस मतदार आहेत. तसेच SIR मुळे त्यांच्या मतदारसंघातील 71 हजार मतं कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. नंतर त्यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे करत असलेले काम बरोबर आहे असे देखील म्हटले.

माध्यमांशी बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, आधीच सगळे विरोधक म्हणत होते की बोगस मतांनी हे निवडून येतात. त्यावेळी एकटा सत्ताधारी पक्षाचा मी म्हणणारा होतो की, माझ्या मतदारसंघात 50 हजार बोगस मतदार आहेत. बरीच नावं डबल आणि बोगस आहेत. SIR मुळे माझ्या मतदारसंघातील 71 हजार मतं कमी झालेत. हे सगळे मतदार काँग्रेसच्या काळातील होते. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं काम बरोबर आहे. आता खरी मतदार यादी बनत आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत व्यक्त केले मत

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतही संजय जाधव यांनी मत मांडले. ज्याप्रमाणे आमच्या पक्षातही कार्यकर्त्यांना वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजेत त्याचप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना ही वाटतं. पण दोन्ही शिवसेना आता एकत्र येऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बांधावर गेलेत. सध्या घोषित कर्जमाफी सुलभ झालेली आहे.

शरद पवार यांच्यावर साधला निशाणा

संजय ज्या विरोधकांनी सरकारकडे मागणी केली की शेतकऱ्यांना नगदी पैसे द्या त्यांनी तरी सत्तेत असताना असं केलं होतं का? विरोधकांना वाटलं होतं की सरकार इतक्या लवकर दुष्काळ जाहीर करणारच नाही. म्हणून त्यांनी मोर्चाचा आंदोलनाचा घाट घातला होता. विरोधकांची सर्व स्वप्न दुष्काळ जाहीर केल्याने धुळीस मिळाली. शरद पवार साहेब तर चार वेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी का दुष्काळ जाहीर झाल्याबरोबर पैसे दिले होते? विरोधक शेतकऱ्यांच्या या परिस्थितीवर आणि दुष्काळावर राजकारण करत आहेत. हे योग्य नाही.

Follow Us
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!