AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साताऱ्यात राजकीय घडामोडींना वेग, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट, चर्चांना उधाण

साताऱ्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शिवेंद्रराजे भोसलेंनी उदयनराजेंची भेट घेतली. या भेटीने चर्चांना उधाण आलं आहे.

साताऱ्यात राजकीय घडामोडींना वेग, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट, चर्चांना उधाण
Satara bank electionImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Sep 29, 2026 | 7:51 AM
Share

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलंय. बँकेच्या या निवडणुकीमुळे जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्ह्यातील विविध नेत्यांची भेट घेण्यास सुरुवात केलीय. त्यांनी ‘जलमंदिर पॅलेस’ येथे जात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या जिल्हा बँक निवडणुकीच्या रणनीतीवर महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीने जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीसाठी शिवेंद्रराजे आणि उदयजनराजे भोसले यांच्यात एकमत झालं.. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. दोन राजेंच्या भेटीची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. यासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या भेट घेण्यास सुरुवात केलीय. शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये जिल्हा बँक निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा केली. ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून ताकदीने एकत्र लढवण्याबाबत दोघांचे एकमत झाल्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही राजे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे आता जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची ताकद वाढणार असून राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. उदयनराजे भोसले यांनी जिल्हा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. परंतु उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हा बँकेत निवडणुकीत राजकारण आणू नये, अशी भूमिका घेतलीये. रामराजे नाईक निंबाळकर यांनीही निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर या बँकेच्या निवडणुकीसाठी शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, अतुल भोसले यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. तसेच शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यातही चर्चा झाली आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...