AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढे यांचा दणका, FDA ची धडक कारवाई, तब्बल 30 परवाने रद्द तर इतक्यांना अटक..

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. एफडीएकडून राज्यभरात जोरदार कारवाई केली जात आहे. त्यातच गणेशोत्सवात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली, ज्याची आकडेवारी पुढे आली.

तुकाराम मुंढे यांचा दणका, FDA ची धडक कारवाई, तब्बल 30 परवाने रद्द तर इतक्यांना अटक..
Tukaram Mundhe
| Updated on: Sep 29, 2026 | 7:41 AM
Share

अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार तुकाराम मुंढे यांनी आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया होत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाया सुरू होत्या. गणेशोत्सवाच्या काळात तुकाराम मुंढे यांनी गणेश मंडळांना देखील मोठा इशारा दिला होता. गणेशोत्सव आणि गौराईच्या काळात राज्यभरात एफडीएकडून धडक कारवाईची मोहिम राबवण्यात आली. यादरम्यान एफडीएकडून तब्बल 30 परवाने निलंबित करण्यात आली तर तब्बल 50 टन साठा जप्त केला. 1 कोटीपेक्षा अधिक किंमत असलेला साठा अन्न व औषध प्रशासन विभागाकडून जप्त करण्यात आला. तुकाराम मुंढे यांच्या या कारवाईचे काैतुक केले जात आहे. त्यांनी भंडाऱ्याबद्दलही नियमावरील जाहीर केली.

मिठाई, नमकीनचे व्यापारी तुकाराम मुंढे यांच्या निशाण्यावर होते. या धाडीत अन्न व औषध प्रशासन विभागाने 50,601.8 किलो साठा जप्त करण्यात आला. ज्याची किंमत 1 कोटी 19 लाख होती. 30 अन्न परवाने निलंबित केली. ज्यात मुंबईतील 13, कोकण विभाग 6, पुणे विभाग 8, छत्रपती संभाजीनगर 3 याप्रमाणे कारवाई करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईत 26 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. 30.93 लाखांचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त केला. हेच नाही एफआयआर दाखल करत 30 लोकांना अटकही करण्यात आली. 3 आस्थापने सील आणि 3 वाहने जप्त करण्यात आले आहेत. फक्त आपल्या मोर्चा रेस्टारंटपर्यंत मर्यादित न ठेवता धाबा, क्लब आणि बेकरीकडेही एफडीएने आपला मोर्चा वळवला आहे.

त्यात काहींचे परवाने रद्द केली. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने भेसळखोरांनी मोठा धसका घेतला. फक्त परवाने रद्द नाही तर कायदेशीर कारवाईही केली जात आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कारवाईने अनेकांनी मोठा धसका घेतला आहे. कोणाचीही गय केली जात नाही. तुकाराम मुंढे यांच्या कामाचे जोरदार काैतुक लोकांकडून केले जात आहे. तुकाराम मुंढे यांची बदली होणार असल्याचीही चर्चा रंगताना दिसली. मात्र, त्यावर स्वत: तुकाराम मुंढे हेच बोलताना दिसले.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...