दुष्काळी स्थिती असताना नगरपरिषद इमारतीच्या गच्चीवर फुल मटण पार्टी, ओल्यापार्टीत नगरसेवक, अधिकाऱ्यांची हजेरी

Amravati Moshi :एका बाजूला महाराष्ट्रात सुका दुष्काळ पडलेला असताना मात्र नागरसेवकांकडून ओली पार्टी होत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दुष्काळी स्थिती असताना नगरपरिषद इमारतीच्या गच्चीवर फुल मटण पार्टी, ओल्यापार्टीत नगरसेवक, अधिकाऱ्यांची हजेरी
Amravati morshi party
| Updated on: Nov 14, 2026 | 3:03 PM

एकीकडे राज्यभरात भीषण दुष्काळाचे संकट घोंगवत असताना आणि शेतकरी हवालदिल झाले असताना, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर रात्रीच्या वेळी कथित ‘ओली पार्टी’ रंगल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा एक ड्रोन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, या प्रकारामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.

शासकीय कार्यालय बंद असताना रात्रीच्या सुमारास इमारतीच्या गच्चीवर असा प्रकार सुरू असल्याचा हा व्हिडीओ समोर आल्याने नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त होत आहे. या पार्टीत नेमके कोणते अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते, याबाबत आता उलटसुलट चर्चांना उधाण आले असून चौकशीची मागणी होत आहे. व्हिडीओमागचे नेमके सत्य काय आहे आणि याप्रकरणी प्रशासन काय कारवाई करते, हे आता तपासाअंतीच स्पष्ट होईल.

Loading...

दुष्काळाचे तीव्र सावट आणि शेतकऱ्यांचे हाल

सध्या पावसाच्या लहरीपणामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही, परिणामी डोळ्यांसमोर उभी पिके करपत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे, या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. गडचिरोली जिल्ह्यासारख्या भागात सर्वदूर दुष्काळ असताना केवळ मोजकेच तालुके दुष्काळग्रस्त घोषित केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळण्यासाठी आणि भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी अलीकडेच भारतीय कम्युनिस्ट पार्टी व ऑल इंडिया किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने करण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us