
अमरावती : अमरावती जिल्ह्यात आयसर ट्रक आणि टाटा एस वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील आहे. अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहे. अमरावती- दर्यापूर अंजनगाव मार्गावर लेहगाव फाटा येथे हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
अमरावती- दर्यापूर अंजनगाव मार्गावर रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. आयसर ट्रक आणि टाटा एस या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्व जण टाटानगर बाबडी येथील आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 2 लहान मुले 2 महिला एका पुरुषांचा समावेश आहे. घटनास्थळी खल्लार पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पोहचले आहेत. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीसांनी तपास सुरु केला आहे.
मृतांमध्ये यांचा समावेश
दर्यापूरच्या टाटानगर येथील शेख एजाज शेख अब्बास हे कुटुंबासाह अंजनगाव येथून मुलीच्या दिराच्या लग्नाच्या निमित्ताने झालेला वलिमा आटोपून टेम्पोने सोमवारी रात्री अंजनगावहून दर्यापूरकडे निघाले होते. त्या यावेळी इटकी फाट्याजवळ टेम्पोला ट्रकने धडक दिली. त्यात शेख अझहर शेख अन्वर 35, नासिया परवीन शेख अझहर 30, अन्सारा परवीन शेख अझहर (9) यांच्यांसह अन्य दोघांचा मृत्यू झाला.
अपघात का होतात
राज्यातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरत आहे. नेमकी कारणं काय? पाहू या…
…तर अपघात टाळणे शक्य
लोकांनी आणि सरकारी यंत्रणे ठरवल्यास या कारणांमुळे होणारे अपघात सहज टाळता येईल. यासंदर्भात साम, दाम, दंड, भेद अशा उपाययोजना करायला हव्या. त्यानंतर अपघाताचे प्रमाण कमी होईल. परंतु सरकारी यंत्रणा आपल्या पारंपारीक कामकाज पद्धतीनेच चालतात. वाहन चालवण्याच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहतात. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.