Amravati MLC Election Result 2026 Updates : महायुतीला मोठं टेन्शन, अमरावतीतून धडकी भरवणारे आकडे, शिंदेंचा बंडखोर मोठा गेम करणार, ऐनवेळी ट्विस्ट?

पहिल्या फेरीतील मतमोजणी झाली आहे. महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीची 3903 मतं मिळाली आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेचे तथा बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना पहिल्या पसंतीची 2209 मतं मिळाली आहेत.

Amravati MLC Election Result 2026 Updates : महायुतीला मोठं टेन्शन, अमरावतीतून धडकी भरवणारे आकडे, शिंदेंचा बंडखोर मोठा गेम करणार, ऐनवेळी ट्विस्ट?
eknath shinde and amravati mlc election result updates today
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2026 | 7:49 PM

Amravati MLC Election Result 2026 Updates : विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे शिक्षक, पदवीधर आणि अमरावतीच्या शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीकडे तर सर्वांचेच लक्ष लागले आहे. या मतदारसंघासाठी काँग्रेसने आदिती पोहरे यांना तिकीट दिलेले आहे. तर महायुतीकडून किरण सरनाईक मैदानात आहेत. विशेष म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांनीही चांगलाच जोर लावला आहे. दरम्यान, आता पहिल्या फेरीतील आकडे समोर आले आहेत. हे आकडे पाहून किरण सरनाईक यांचं टेन्शन वाढलं आहे.

पहिल्या फेरीतील आकडे काय सांगतात?

अमरावतीतील विधानपरिषद शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत पहिल्याच फेरीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे या चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत. आदिती पोहरे यांना केवळ 1319 पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत. दुसरीकडे किरन सरनाईक यांनी मात्र पहिल्या फेरीत बाजी मारली आहे. त्यांना 3903 मतं मिळाली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर नेत्याने मात्र सरनाईक यांचं टेन्शन वाढवलं आहे.

Loading...

श्रीकांत देशपांडे यांनी वाढवलं टेन्शन

पहिल्या फेरीतील मतमोजणी झाली आहे. महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीची 3903 मतं मिळाली आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेचे तथा बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना पहिल्या पसंतीची 2209 मतं मिळाली आहेत. ते पहिल्या फेरीतील मतमोजणीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अपक्ष उमेदवार सुरेश देवकर हे तिसऱ्या स्थानी असून त्यांना 1582 मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना 1319 मतं मिळाली आहेत.

श्रीकांत देशपांडे वाढवणार टेन्शन?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे दत्तात्रय लहाने यांना 1169 मतं तर भाजपाच्या बंडखोर संगीता शिंदे यांना पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीची 698 मतं मिळाली आहेत. भाजपाचेच बंडखोर शेखर भोयर यांना 432 मतं मिळाली आहेत. सध्या पहिल्या फेरीत सरनाईक हेच आघाडीवर आहेत. परंतु शिंदे यांच्या शिवसेनेचे बंडखोर श्रीकांत देसपांडे हे सरनाईक यांची डोकेदुखी वाढवू शकतात. बंडखोर असूनही ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे आगामी मतमोजणीच्या फेरीत ते आघाडी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच महायुतीची धाकधूक वाढली आहे. अर्थात अजून बरीच मतमोजणी बाकी आहे. त्यामुळे फासे कसे फिरणार, कोण बाजी मारणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसून अंतिम निकाल बाकी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us