Amravati Hospital | उन्हाने लाहीलाही, तीन महिन्यांपासून एसी बंद; अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार

एसी बंद असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या संदर्भात संबंधित बांधकाम विभागाला वारंवार सूचना दिली आहे. त्यांनी काम केलं नाही. त्यामुळे एसी नादुरुस्त आहे.

Amravati Hospital | उन्हाने लाहीलाही, तीन महिन्यांपासून एसी बंद; अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील बंद असलेला एसी.
Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: May 09, 2022 | 11:20 AM

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (District General Hospital) शवविच्छेदन गृहात फ्रिजर रूममध्ये एसी आहे. पण, हा एसी गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणा (Health System) किती निष्क्रिय आहे हे पुन्हा एक वेळा सिद्ध झाले आहे. शवविच्छेदन गृहातील रूममध्ये मृतदेहासाठी ठेवण्यासाठी असलेले फ्रीजरही बंद आहे. या ठिकाणी शवविच्छेदन कक्षात (Autopsy House) एकाच रूममध्ये चार मृतदेहासाठी एक, प्रत्येकी दोन मृतदेह ठेवण्यासाठी दोन फ्रीजर आहेत. परंतु रूममधील एसीच बंद असल्याने मृतदेह ठेवण्यासाठी लागणारे वातावरण या रूममध्ये नाही. मृतदेहातून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

मृतदेहांसाठी थंड वातावरण आवश्यक

या शवविच्छेदन गृहात मृतदेह लवकर सडू नये किंवा त्यातून दुर्गंधी येऊ नये. अशा थंड वातावरणाची व्यवस्था असते. परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात मृतदेहासाठी आवश्यक थंड वातावरणासाठी बसविण्यात आलेले दोन्ही एसी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. सर्वसामान्य माणूस संताप व्यक्त करत आहे.

एसी दुरुस्तीची पुन्हा तक्रार दिली

एसी बंद असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या संदर्भात संबंधित बांधकाम विभागाला वारंवार सूचना दिली आहे. त्यांनी काम केलं नाही. त्यामुळे एसी नादुरुस्त आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करून तातडीने एसीचे काम करण्याची सूचना दिली आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आरएमओ डॉ. नरेंद्र सांळुके यांनी यावेळी दिली. सरकारी काम सहा महिने थांब याची प्रचिती अमरावतीकर नागरिकांना आली आहे.