शाब्बास पोरी नाव काढलंस… दृष्टिहीन माला पापळकर झाली MPSC उत्तीर्ण…

Amravati Blind Girl Mala Papalkar Passed in MPSC Exam : अमरावतीत चर्चा होतेय ती माला पापळकर हिने मिळवलेल्या यशाची... माला पापळकर हिने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होतं आहे. वाचा सविस्तर...

शाब्बास पोरी नाव काढलंस... दृष्टिहीन माला पापळकर झाली MPSC उत्तीर्ण...
Follow us
| Updated on: May 19, 2024 | 9:01 PM

जीवनात यशस्वी व्हावं, खूप यश मिळवावं, असं कुणाला वाटत नाही? पण त्यासाठी लागते जिद्द अन् मेहनत… या दोन गोष्टीच्या जोरावर कोणतंही मोठं यश तुम्ही मिळवू शकता. अशीच यशाची पायरी चढली आहे ती अमरावतीच्या लेकीनं… माला पापळकर हिने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केलीय. यासाठी तिचं प्रचंड कौतुक होतंय. पण मालाची कहानी जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुमचेही डोळे पाणवतील… माला दृष्टिहीन आहे. तिला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. शिवाय ती अनाथ आहे, त्यामुळे मालाने मिळवलेलं यश हे विशेष आहे. त्याचमुळे सर्वत्र मालाचं तोंड भरून कौतुक केलं जात आहे.

माला झाली अधिकारी…

अमरावतीची लेक माला पापळकर… हिने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केलीय. अमरावती जिल्ह्यातील वझर गावातील स्व.अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमातील लेकीनं हे घवघवतं यश मिळावलं आहे. दोन्ही डोळ्यांनी अंध असणारी माला शंकरबाबा पापळकर ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या उत्तीर्ण यादीत माला पापळकर हिचं नाव जाहीर झालं आहे. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली माला पापळकर हिने ही परीक्षा पास झाली आहे. माला ही स्व.अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहात राहाते. मालाच्या या यशामुळे शंकर बाबाच्या वझ्झरच्या आश्रमात दिवाळी सणासारखा आनंद पसरला आहे.

अन् माला झाली शंकरबाबा यांची मानस कन्या

20 वर्षांपूर्वी माला ही दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली चिमुकली जळगाव पोलिसांना रेल्वे स्थानकावर बेवारस सापडली होती. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमात या मुलीला पाठवण्याचं ठरवलं. शंकर बाबा यांनी तिला स्वीकारून माला हे नाव दिलं. तेव्हापासून आतापर्यंत माला ही याच आश्रमात राहाते आहे. शंकरबाबा यांनी मालाला मानस कन्या मानलं. माला याच नावाने तिचं आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, रहिवासी दाखला आणि आधी कागदपत्रे आहेत. आता मालाने जे घवघवीत यश मिळवलं आहे. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.