“अमरावतीला जातीय-धार्मिक ध्रुवीकरणाची प्रयोगशाळा करण्याचा प्रयत्न”; म्हणून काँग्रेसच्या आमदारांनी बेरोजगारांसाठी थेट जॉब महोत्सवाचेच आयोजन

| Updated on: May 16, 2023 | 6:08 PM

यशोमती ठाकूर यांच्यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील अनेक युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या भागातील युवकांचे प्रश्न सोडवण्यास मदत होणर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अमरावतीला जातीय-धार्मिक ध्रुवीकरणाची प्रयोगशाळा करण्याचा प्रयत्न; म्हणून काँग्रेसच्या आमदारांनी बेरोजगारांसाठी थेट जॉब महोत्सवाचेच आयोजन
Follow us on

अमरावती : राज्यातील राजकारण शिवसेना आणि ठाकरे गटातील हेवदावे आणि आरोप प्रत्यारोप यांच्यामुळे ढवळून निघाले असतानच अमरावती शहरामध्ये मात्र वेगळं चित्र दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांकडून वारंवार केंद्र सरकारवर लोकांचे मूलभूत प्रश्न जैसे थे ठेवून जातीय राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची काँग्रेसकडून केली जात आहे. त्यावरून आता अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना आमदारर यशोमती ठाकूर यांनी अमरावती शहरात जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी जॉब महोत्सव आयोजित करण्यात आला असून यानिमित्ताने त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जातीय राजकारणावरून हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात टीका करताना त्यांनी आपल्या ट्विटमधये म्हटले आहे की, अमरावतीला गेल्या काही वर्षांपासून जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाची प्रयोगशाळा करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून चालवला जात आहे.

एकीकडे जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाची प्र्योगशाळा बनवण्याचे काम येथे चालत आहे तर दुसरीकडे यशोमती ठाकूर यांनी जनतेचे मुलभूत प्रश्नांवर सवाल उपस्थित करुन सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. सध्या राज्यातील युवकांचे प्रश्न वेगळे आहेत.

 

तर रोटी-कपडा-मकान-रोजगार आणि शेती-मातीचे प्रश्न गंभीर असल्याचा घणाघातही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. केंद्रात आणि राज्यात असलेले सरकार लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक सोडवणूक केल्याने आता आम्ही त्यांच्या हाताला काम देण्याचे ठरविण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून अमरावतीत आम्ही जॉब महोत्सव भरवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यशोमती ठाकूर यांच्यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील अनेक युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या भागातील युवकांचे प्रश्न सोडवण्यास मदत होणर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.