“आपलेच गद्दार निघाले…” भाजप बंडखोर उमेदवाराला पराभव जिव्हारी, अमरावती शिक्षक मतदारसंघातील शेखर भोयरांचा शिक्षकांवर थेट निशाणा
Amravati Teachers constituency election result 2026: अमरावती शिक्षक मतदारसंघात यंदा बंडाचे वारे दिसले. शिवसेना, भाजपमध्ये बंडाळी दिसली. पण किरण सरनाईक यांनी विजय खेचून आणला. त्यानंतर भाजपचे बंडखोर उमेदवार शेखर भोयरांचा शिक्षकांवर थेट निशाणा साधला.

BJP Rebel Candidate Shekhar Bhoyar: अमरावती शिक्षक मतदारसंघात यंदा किरण सरनाईक यांनी पुन्हा बाजी मारली. विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्याविरोधात शिवसेना आणि भाजपमधूनही बंडाळी झाली. शिंदे गटातून श्रीकांत देशपांडे यांनी बंड पुकारले होते. तर भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिणी संगिता बोंडे यांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात जंग जंग पछाडले. त्याचवेळी भाजपचे नेते शेखर भोयर हे सुद्धा मैदानात उतरले. पण सरनाईकांनी बाजी मारली. या पराभवानंतर भाजपचे बंडखोर उमेदवार शेखर भोयरांचा शिक्षकांवर थेट निशाणा साधला.
आपलेच गद्दार निघाले
“ज्यांच्यासाठी १८ वर्ष आयुष्य वेचलं. त्यांनीच अखेर साथ सोडली! १८ वर्ष लढलो, संघर्ष केला. पण पदरी काय आलं? आपलेच गद्दार निघाले. मनात वेदना आहेत, शब्द अपुरे आहेत ! राम राम !, अशा शब्दात भोयर यांनी शिक्षकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. आपलेच गद्दार निघाले अशा शब्दात अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात पराभवानंतर भाजपचे बंडखोर शेखर भोयरांचा शिक्षकांवर थेट निशाणा साधला. अमरावती शिक्षक मतदारसंघ निकालानंतर भोयर यांची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
किरण सरनाईक यांनी मारली बाजी
या अटीतटीच्या लढतीत किरण सरनाईक यांच्यासमोर मोठे आव्हान उभे होते. शिवसेना शिंदे गटाचे किरण सरनाईक यांना एकूण 16,663 मते मिळाली. त्यांनी सलग दुसर्यांदा या मतदारसंघात विजय मिळवला आहे. तर काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे यांना पराभव पत्काराला लागला. त्यांना या निवडणुकीत 8,636 मते मिळाली. शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनी या निवडणुकीत बंडखोरी केली होती. त्यांना 7,117 मतं मिळाली. ते या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. किरण सरनाईक यांनी पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या कोटा पूर्ण करत विजय मिळवला.
यावेळी अमरावती शिक्षक मतदारसंघात पश्चिम विदर्भातील अनेकांनी नशीब आजमावले. यामध्ये केवळ शिक्षक संघटनांचे प्रतिनिधीच नाही तर इतर क्षेत्रातील दिग्गजांनीही निवडणूक लढवून पाहिली. पण वारं फिरलं. तगड्या उमेदवारांचं आव्हान असतानाही सरनाईकांनी बाजी मारली.