आला पावसाळा, आरोग्य सांभाळा; या जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण आढळल्याने खळबळ

| Updated on: Jul 07, 2023 | 7:39 PM

पावसाळा सुरू झाला असल्याने साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी शरद जोगी यांनी दिली आहे.

आला पावसाळा, आरोग्य सांभाळा; या जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण आढळल्याने खळबळ
Follow us on

अमरावती : पावसाळा सुरू झाला की, आजारांचे प्रमाण वाढते. वातावरणात बदल होतात. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून राहते. डास तयार होतात. या सर्व कारणामुळे पावसाळ्यात आजाराचे प्रमाण वाढते. अशावेळी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात पाणी उखळून थंड करून प्यावे, असा आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येते. पण, बरेच नागरिक असे करताना दिसून येत नाही. याशिवाय अन्य कारणांनीही आजार बळावतात. अशावेळी आरोग्य जपण्याशिवाय काही राहत नाही.

१०५ मलेरियाचे रुग्ण

अमरावती जिल्ह्यात १०५ नमुने मलेरिया तपासणीकरिता घेण्यात आले. यातील २१ रुग्ण डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. यासोबतच ८ चिकनगुनियाचे देखील रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील जनता साथ रोगाने मेटाकुटीला आली आहे.

योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत

पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याप्रकरणी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाला असल्याने साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी शरद जोगी यांनी दिली आहे.

प्रत्येक आरोग्य केंद्रात पथक तैनात

पावसाळा सुरू होताच डेंग्यू, मलेरियासह इतर आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात एक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून बाधित गावांना भेटी देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी शरद जोगी यांनी दिली.

स्वच्छता ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. हातगाड्या, पानठेले, फेरीवाले यांनीही स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा आजार बळावण्यास वेळ लागत नाही.

पावसाळा सुरू झाल्यापासून आरोग्य विभाग सक्रिय झाले आहे. गावात पथकं जाऊन तपासणी करतात. त्यापैकी काही रुग्ण निघाल्यास त्यांच्यावर औषधोपचार केला जातो. रुग्णांवर नियंत्रण ठेवले जात असल्याचं आरोग्य विभागाचे अधिकारी सांगतात.