AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, अजितदादांच्या विमान अपघातावर गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवार यांच्या अपघाताबद्दल रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. दरम्यान यावर आता गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

...तर रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, अजितदादांच्या विमान अपघातावर गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया
गुणरत्न सदावर्ते यांची रोहित पवार यांच्यावर टीका Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 26, 2026 | 7:59 PM
Share

अजित पवार यांचा भीषण विमान अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला, या विमान अपघात प्रकरणात वारंवार आमदार रोहित पवार यांच्याकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही? असा सवाल करत रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत, त्यांनी आज पुण्यात सीआयडी अधिकाऱ्यांची देखील भेट घेतली आहे. दरम्यान आता या प्रकरणावर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले सदावर्ते? 

आमदार रोहित पवार हे फक्त चमकोगिरी करत आहेत, अजित पवार यांच्या अपघाताचा  तपास योग्य दिशेनं सुरू आहे. कालच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या गोंधळा प्रकरणात रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, रोहित पवार यांना विमान अपघातामधलं काय समजतं? असा हल्लाबोल गुणरत्न सदावर्ते यांनी रोहित पवार यांच्यावर केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, एकाच प्रकरणात दोन ठिकाणी गुन्हे दाखल होत नाहीत. 2001 साली याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. काल रोहित पवारांनी पोलीस ठाण्यात राडा घातला. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही?  रोहित पवार चमकोगिरी करत आहेत, रोहित पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत.  सुनेत्रा पवार या डंके की चोट पर काम करत आहेत. रोहित पवार यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी तपास यंत्रणांकडे द्यावेत,  याप्रकरणी फक्त त्यांचा जबाब घेतला जाऊ शकतो, रोहित पवार राजकारण करत आहेत, असं यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात सीआयडीची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना तपास योग्य दिशेनं सुरू असल्याची माहिती सीआयडीकडून देण्यात आली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...