त्या दिवशी राजकारणाचा धंदा सोडेल, देवेंद्र भुयार यांनी जाहीर सभेत सांगितलं

| Updated on: Oct 21, 2022 | 6:15 PM

माया बापाची 18 एकर शेती जिवंत आहे.

त्या दिवशी राजकारणाचा धंदा सोडेल, देवेंद्र भुयार यांनी जाहीर सभेत सांगितलं
देवेंद्र भुयार यांची मोठी घोषणा
Image Credit source: tv 9
Follow us on

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देवेंद्र भुयार हे अमरावती येथे पक्षाच्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी बोलताना भुयार म्हणाले, कोरोनात बोलावं असं वाटतं होतं. पण, लोकं एकत्रित करता येत नव्हती. शासकीय कार्यक्रमात भेट व्हायला लागली. पण, सगळे जण एकत्र येऊन कार्यक्रम केला पाहिजे. त्यानिमित्त हा कार्यक्रम ठरविण्यात आला, असं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देवेंद्र भुयार म्हणाले, मी वाल्याच आहे. आग्यामोहोळ सारखे आपण आहोत. आपण कोणाच्या नादाला लागत नाही. आपला सरळ सरळ स्वभाव आहे. सरळ सोप्या पद्धतीनं राजकारण करायचं. काही गळबळ करायची नाही. पैशाचा आपला विषयचं नाही.

मला काही लोकं म्हणाले, आमदार साहेब काहीतरी जमवावं लागेल. निवडणूक समोरची कठीण आहे. मागच्या वेळी फुकट निवडणूक झाली. चिकन, मटन, पैसे वाटायचं काम येईल. त्या दिवशी राजकारणाचा धंदा सोडून देऊ.

माया बापाची 18 एकर शेती जिवंत आहे. नामदेवराव भुयार, कृष्णराव भुयार यांच्यापासून माझी तेवढी जमीन आहे. तेवढी जमीन वाहण्यासाठी सक्षम आहे. माझे हात काही बांधले नाहीत. वखरण, डवरण सगळं मला येते. पण, चुकीच्या पद्धतीनं राजकारण करणं हा काही माझा स्वभाव नाही, असं देवेंद्र भुयार यांनी स्पष्ट सांगितलं.

काही लोकं मला बदनाम करण्याच्या प्रयत्नात आहेत. भुयार पैसे घेते का, भुयार कोण्या बाईच्या भानगडीत आहे का, भुयारचे काही चोट्टे धंदे आहेत का. ही सगळी शोधाशोध काही लोकांनी सुरु केली.

मी प्रामाणिक आहे. सत्ता बदलाच्या वेळी प्रचंड दबाव येत होता. फोन खतरनाक होते. पण, त्यांना सांगितलं. मी चौट्टा धंदा मी करणार नाही. आजही आहे, मी उद्याही तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही देवेंद्र भुयार यांनी दिली.