Amravati | अचलपूर दंगल प्रकरणी अनिल बोंडेंना पोलिसांनी ताब्यात घ्यावे, काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकरांची मागणी

| Updated on: Apr 19, 2022 | 4:24 PM

अनिल बोंडे यांचं मानसिकता संतुलन बिघडले आहे. आता ते दुपारीही दारू पिऊ लागले आहेत, तर अचलपूर दंगल प्रकरणी अनिल बोंडेच मास्टर माईंड आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं, अशी मागणी काँग्रेसने केली, तर अनिल बोंडे यांचा बंदोबस्त आता काँग्रेस करेल असा इशाराही काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी दिला.

Amravati | अचलपूर दंगल प्रकरणी अनिल बोंडेंना पोलिसांनी ताब्यात घ्यावे, काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकरांची मागणी
अनिल बोंडे व दिलीप एडतकर
Follow us on

अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर शहरात झालेल्या दंगलीत अचलपूर भाजप शहराध्यक्ष अभय माथने याला पोलिसांनी अटक करण्यात आली. त्यानंतर अमरावतीत भाजप आक्रमक झाली आहे. भाजपाचे नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी या दंगलीमागे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नसून, या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) या दंगली मागच्या खऱ्या मास्टर माईंड असल्याचा आरोप केला होता. यावर आता काँग्रेसने प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे राज्य प्रवक्ते दिलीप एडतकर (Dilip Edatkar) यांनी भाजप नेते अनिल बोंडे यांच्यावर पलटवार केला. अनिल बोंडे यांचं मानसिकता संतुलन बिघडले आहे. आता ते दुपारीही दारू पिऊ लागले आहेत, तर अचलपूर दंगल प्रकरणी अनिल बोंडेच मास्टर माईंड आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं, अशी मागणी काँग्रेसने केली, तर अनिल बोंडे यांचा बंदोबस्त आता काँग्रेस करेल असा इशाराही काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी दिला

अनिल बोंडे वैफल्यग्रस्त – ठाकूर

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, अनिल बोंडे वैफल्यग्रस्त अवस्थेत आहेत. अनिल बोंडेंचा अमरावतीत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. डॉ. बोंडे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. स्वत:च्या मुलाला बाहेर गावी पाठवलं. अमरावतीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमरावतीचं वातावरण खराबं करण्याचं काम केलं जातंय, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी लावला.

भाजपचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा

अचलपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भाजप पदाधिकाऱ्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. त्यानंतर निवेदन देण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. जिल्हाधिकारी पवनीत कौर एका बैठकीमध्ये व्यस्त होत्या. यावेळी संतप्त पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर निवेदन चिकटवले. मात्र कार्यालयातील सुरक्षारक्षकांनी दालनावर लावलेले निवेदन तात्काळ फाडून टाकले. यावेळी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या कक्षाजवळच भाजपने जोरदार घोषणाबाजी केल्या. विनाकारण भाजप कार्यकर्त्यांना अचलपूर दंगल प्रकरणी गोवण्यात येत असल्याचा आरोप भाजपने केला.

दुपारी दोन तास संचारबंदी शिथील

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात झेंडा लावण्याच्या कारणांमुळे दोन गट आमनेसामने आल्याने तुफान दगडफेक झाली होती. त्यामुळे शहरात संचार बंदी लागू करून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान शहरात नागरिकांना जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तू खरेदी करता याव्या यासाठी प्रशासनाने दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत असे दोन तास संचारबंदीत काही अंशी शिथीलता दिल्याने बाजारपेठ खुलली होती. त्यामुळे नागरिक आज खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. दरम्यान संचारबंदीमध्ये आणखी शिथीलता देऊन सकाळी बाजारपेठ उघडण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी व्यवसायिक व नागरिकांनी केली.

Curfew in Achalpur | अचलपुरात संचारबंदीचा दुसरा दिवस, शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा पुढं ढकलल्या; गावात तणावपूर्ण शांतता

Video Dilip Walse Patil | राज्यातील काही संघटना दंगली घटविण्याच्या प्रयत्नात, पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना

Ramdas Athawale on Raj Thackeray | एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे; नागपुरात रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर टीका