राऊत म्हणाले 20 फुटाच्या खड्यात गाडून टाकू; …अन् स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी खरचं खड्डा खोदला…

| Updated on: Apr 26, 2022 | 8:13 PM

कार्यकर्त्यांनी आज 20 फुटाचा खड्डा खोदून त्याला संजय खड्डा असं नाव दिलं तर गोवऱ्या तयार केल्या यालाही संजय गोवऱ्या नाव देत या गोवऱ्यांचे दहन करून अभिनव आंदोलन करण्यात आले.

राऊत म्हणाले 20 फुटाच्या खड्यात गाडून टाकू; ...अन् स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी खरचं खड्डा खोदला...
अमरावतीत संजय राऊत नावाचा वीस फुटाचा खड्डा
Image Credit source: TV9
Follow us on

अमरावती: शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तीन दिवसापूर्वी नागपूर येथे शिवसेनेच्या विरोधात पंगा घ्याल, तर वीस फुटाच्या खड्यात गाडून टाकू, तुमच्या गोवऱ्या तयार ठेवा असं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत आमदार रवी राणा यांच्या स्वाभिमानच्या (Swabhiman) कार्यकर्त्यांनी आज 20 फुटाचा खड्डा खोदून त्याला संजय खड्डा असं नाव दिलं तर गोवऱ्या तयार केल्या यालाही संजय गोवऱ्या नाव देत या गोवऱ्यांचे दहन करून अभिनव आंदोलन करण्यात आले.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा हट्टहास धरला होता. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या विरोधात पंगा घ्याल, तर वीस फुटाचा खड्यात गाडून टाकू, तुमच्या गोवऱ्या तयार ठेवा असं वक्तव्य केलं होतं. या त्यांच्या वक्तव्याचा अमरावतीत निषेध व्यक्त करण्यात आला होता.

खड्ड्याचे नाव संजय राऊत

त्यानंतर आमदार रवी राणा यांच्या स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत 20 फुटाचा खड्डा खोदून त्याला संजय खड्डा असे नाव दिले होते. संजय राऊत यांच्या या विधानाचा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा करण्यात आली होती. शिवसेनेकडून मात्र या त्यांच्या वक्तव्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. मात्र या वक्तव्यावरुन अमरावतीत राजकारण मात्र जोरदार तापले आहे.

उपमुख्यमंत्र्यांचे खडे बोल

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या हनुमान चालीसा प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्याच घरी जाऊन कशाला म्हणायची आहे हनुमान चालीसा, तुम्हाला म्हणायचीच असेल तर तुमच्या घरात जाऊन म्हणा असे खडे बोलही त्यांनीही सुनावले होते.

राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणा

यावेळी संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. संजय राऊत यांनी मुंबईतील खड्ड्यांची माहिती असल्याने ते खड्ड्यांची भाषा करत आहेत, त्यामुळे संजय राऊत यांनी खड्ड्याची भाषा बंद करावी असे आवाहन युवा स्वाभिमान पक्षाचे युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्षजितू दुधाणे यांनी केले. यावेळी संजय राऊत यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.   कार्यकर्त्यांनी केले.