Prakash Ambedkar on Ajit Pawar | अजित पवार टीव्हीशी बोलण्यापेक्षा वकिलांना घेऊन खुली चर्चा का करत नाहीत? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

| Updated on: May 21, 2022 | 4:01 PM

देशात भाजपने दडपशाहीचे राजकारण सुरू केलं आहे. उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जात आहेत. भाजपाने देशात मोकळं वातावरण ठेवलं नाही. मलाही ईडीची नोटीस दिली होती.

Prakash Ambedkar on Ajit Pawar | अजित पवार टीव्हीशी बोलण्यापेक्षा वकिलांना घेऊन खुली चर्चा का करत नाहीत? प्रकाश आंबेडकरांचा सवाल
अजित पवार, प्रकाश आंबेडकर.
Image Credit source: tv 9
Follow us on

अमरावती : ओबीसी आरक्षण मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) लागू झाले. मग महाराष्ट्रात का नाही, यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, यासंदर्भात मी दोन दिवसांत स्वतंत्र भूमिका मांडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे टीव्हीशी बोलतात. पण, त्यांनी त्याऐवजी वकिलांशी (Advocate) खुली चर्चा करावी. त्यातून काहीतरी मार्ग निघेल. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायला नकोत, असं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, राज्यातील राजकीय पक्ष (Political Party) हे गुलाम झाले आहेत. त्यांनी वकिलांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढावा. श्रीमंत मराठा गरिबांशी इमानदारी राखू शकत नाही. ओबीसींनी आता भूमिका घेतली पाहिजे की, सत्ताधारी श्रीमंत मराठ्यांना मतदान करणार नाही. तरच ओबीसींचं आरक्षण त्यांना मिळेल अन्यथा नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

दम असेल तर मला उचलून दाखवावं

देशात भाजपने दडपशाहीचे राजकारण सुरू केलं आहे. उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जात आहेत. भाजपाने देशात मोकळं वातावरण ठेवलं नाही. मलाही ईडीची नोटीस दिली होती. दम असेल मला उचलून दाखवून कारवाई करावी, असे थेट आवाहन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला दिलं. मात्र यावेळी भाजपावर टीका करताना प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली होती.

तरच अशा दंगली थांबतील

ज्ञानव्यापी प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टमध्ये असे अनेक जज आहेत. ज्यांच्या व्यक्तिगत प्रॉपर्टी आहेत. एखाद्याने इतिहास कालीन पुरावे सादर करून जागेवर हक्क सांगितला, तर कोर्ट एंटरटेन करेल का ? याचा खुलासा झाला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक याचिका यायला सुरुवात होईल. दरम्यान, मुसलमानांमधला काही वर्ग जो आजही पंढरपूरची वारी करतो आणि हिंदूमधला एक वर्ग जो दर्ग्यावर आजही चादर चढवतो. या दोन्ही समाजातील मंडळींनी पुढे यावे. तरच अशा दंगली थांबतील, असंही आंबेडकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा