आंचलच्या वडिलांसोबत भन्नाट डान्स…, सक्षमचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ…, त्यानंतर असं काय घडलं ज्यामुळे झाला खून?

मुलीच्या कुटुंबियांनी दोघांच्या नात्याला असा विरोध केला, ज्यामुळे मुलाला स्वतःचे प्राण गमवावे लागले आहे... ज्यामुळे संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला आहे... आंचल आणि सक्षम यांच्या नात्याने सर्वांना थक्क केलं असून. सक्षम याचा मारेकऱ्यांसोबत असलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे...

आंचलच्या वडिलांसोबत भन्नाट डान्स..., सक्षमचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ..., त्यानंतर असं काय घडलं ज्यामुळे झाला खून?
Saksham Tate
| Updated on: Dec 02, 2025 | 1:40 PM

आपण जग बदलत आहे असं म्हणतोय, पण जातीचा विषय आला की, कोणी मागेपुढे पाहत नाही… असंच काही नांदेड येथे घडलं आहे. अंतरजातीय प्रेम प्रकरणातून अवघ्या 19 वर्षांच्या सक्षम ताटे याला स्वतःचे प्राण गमवावे लागले आहे. आंचल हिच्यावर प्रेम केल्याची सक्षम आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठी किंमत मोजवी लागली आहे… आंचल आणि सक्षम यांच्या नात्याबद्दल कळल्यानंतर मुलीचे वडील आणि भावांनी सक्षम याची निर्घृण हत्या केली. प्रियकराला आपल्याच वडिलांनी आणि भावाने संपवल्यानंतर… माझे जिंकून देखील हारले… पण सक्षम जिंकला… असं म्हणत आंचल हिने वडील आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

सक्षम ताटे याच्या हत्येनंतर सर्वत्र हाहाकार माजलेला असताना सक्षम याचा आंचल हिच्या वडिलांसोबत आणि भावांसोबत भन्नाट डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांच्यासोबत आंचल देखील डान्स करताना दिसत आहे. यावरून दिसून येत आहे की, आंचल हिचे कुटुंबिय सक्षम याच्या ओळखीतील होते.

 

 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ 14 एप्रिल रोजीच्या भीम जयंती मिरवणुकीतील आहे. मिरवणुकीत आंचल हिच्या कुटुंबियांसोबत सक्षण देखील सहभागी झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आंचलचे वडील गणेश मामीडवार हे गेल्यावर्षी 14 एप्रिल रोजीच्या भीम जयंती मिरवणुकीत सहभागी झाले होते.

आंचल हिचा भाऊ आणि सक्षम चांगले मित्र होते. त्यांच्या घरी सक्षम याचं जाणं येणं देखील होतं… पण सक्षम आणि आंचल यांच्या नात्याबद्दल माहिती होताच, सक्षम याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सक्षम याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. तरी तो जिवंत होता. पण सक्षम जिवंत असल्याचं कळताच त्यांच्या डोक्यात दगड घातला. त्यांनी आपल्या मुलीचा थोडासाही विचार केला नाही.

सक्षम याच्या निधनानंतर आंचल हिने प्रियकराच्या घरी राहण्याचा निर्यण घेतला आहे. एवढंच नाही तर, तिने सक्षम याच्या मृतदेहासोबत लग्न केलं आणि कायम त्याचीच राहिल असं देखील आंचल म्हणाली. शिवाय आंचल हिला मुलीसारखी नाही तर, मुलासारखी ठेवेल… असं सक्षम याची आई म्हणाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्कारापूर्वी आंचल हिने सक्षमच्या मृतदेहाला आणि स्वतःला हळद लावली… कपाळावर सिंदूर भरलं. ती सक्षमची नवरी बनली. आता तिने त्याच्याच घरी राहण्याचा निर्णय घेतला. घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.