
Pankaja Munde PA Anant Garje : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी यांनी राहत्या घरात स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात कार्यरत असलेल्या गौरीनं टोकाचं पाऊल उचललं असून, याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात गौरी आणि अनंत यांचं लग्न झालेलं. गौरी यांच्या मैत्रिणींनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर अनेकदा त्यांच्या शरीरार मारल्याच्या खुणा असायच्या… असा खुलासा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. सध्या याप्रकरणी पोलीस देखील कसून चौकशी करत आहेत.
अंजली दमानिया म्हणाल्या, गौरीच्या मौत्रिणी सांगत होत्या जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे. एक मैत्रीण तिला गेल्या दीड वर्षांपासून ओळखत आहे… पण फेब्रुवारी पासून आतापर्यंत अनेकदा तिच्या शरीरावर मारल्याचा खुणा दिसायच्या… म्हणजे तिला मारहाण व्हायची… हे जेव्हा कळल्यानंतर अधिक दुःख होतं. काल 1 वाजेपर्यंत ती ड्यूटीवर होती. त्यानंतर ती घरी गेली आणि संध्याकाळी 6.30 असं कळलं असेल, तर त्या पाच तासांत काय झालं? असा प्रश्न देखील याठिकाणी उपस्थित होत आहे…
यावर अंजली दमानिया म्हणाल्या, ‘ती आधी ज्या बीडीडी चाळीत राहत होती. जेव्हा त्यांना मोठ्या टॉव्हरमध्ये शिफ्ट करण्यात आलं. तेव्हा पॅकिंग करताना गौरीला काही पेपर मिळाले. त्यामध्ये एक पेपर होता, त्यावर किरण इंगळे असं एका महिलेचं नाव होतं. तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, तेव्हा किरण हिच्या नवऱ्याचं नाव म्हणून अनंत गर्जे असं लिहिलं होतं… यानंतर दोघांमध्ये वाद झाले… असं वडील आणि आईने सांगितलं आहे…’
अनंत गर्जे यांच्या बहिणीचा देखील गौरी यांच्यावर दबाव होता… असं अंजली दमानिया यांनी सांगितलं आहे. अनंत गर्जे यांच्या बहिणीचं नाव बहीण शीतल आंधळे असं आहे. गौरी नणंद सर्वकाही सांगायची.. पण नणंद म्हणायची तुला नादायचं असेल तर नाद नाही तर आम्ही दुसरं लग्न करून घेऊ…
पती अनंत भगवान गर्जे, नणंद शीतल आंधळे आणि दीर अजय भगवान गर्जे हे माझ्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार आहेत. अनंत गर्जे हा गौरीने आत्महत्या केली असं सांगत असला तरी ही आत्महत्या आहे की घातपात आहे याची चौकशी व्हावी. वरील तीन लोकांविरोधात माझी तक्रार आहे, असं गौरीच्या वडिलांनी पोलिसांना स्टेटमेंट दिलं आहे.