AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anjali Damania : काँग्रेसने सुनेत्रा पवारांना ‘गुंगी गुडिया’ म्हणताच अंजली दमानिया खवळल्या; सडेतोड प्रत्युत्तर

anjali damania : अंजली दमानिया यांनी काँग्रेसवर जोरदर टीका केली आहे. त्यांनी काँग्रेसच्या गुंगी गुडिया शब्दावर आक्षेप घेतला.

Anjali Damania : काँग्रेसने सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणताच अंजली दमानिया खवळल्या; सडेतोड प्रत्युत्तर
| Updated on: Aug 04, 2026 | 7:58 AM
Share

राज्याच्या राजकारणात बीडमधील एका व्हिडिओवरून राजकारण पेटलं आहे. बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारणाऱ्या माध्यमांना धनंजय मुंडेंनी थांबवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या घटनेवरून काँग्रेसने थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांनाच लक्ष्य केलं. गुंगी गुडिया म्हणत काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना लक्ष्य केलं. परंतु काँग्रेसने केलेले टीकेचे वार जिव्हारी लागल्याने या वादात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी मारली आहे. अंजली दमानिया यांनी सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणून संबोधणाऱ्या काँग्रेसवरच टीका केली आहे .

अंजली दमानिया यांनी ‘एक्स’ने पोस्ट करत काँग्रेसने सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. अंजली दमानिया यांनी काँग्रेसच्या भाषेवर आक्षेप घेतला. अंजली दमानिया म्हणाल्या, ‘गुंगी गुडिया? काय ही भाषा? एका पक्षाला ही भाषा शोभते का? पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? मी राष्ट्रवादी पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे आहेत. मी याचा तीव्र शब्दात निषेध करते’.

काँग्रेसने नेमकं काय म्हटलं होतं?

काँग्रेसने सुनेत्रा पवारांवर टीका केली होती. काँग्रेसने एक व्हिडिओ पोस्ट करून उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. काँग्रेसने म्हटलं होतं की, सुनेत्रा पवार, अजून किती दिवस ‘गुंगी गुडिया’ बनून राहतील’.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या बीड दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी बीडच्या जिल्हा नियोजन बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. या परिषदेत पत्रकाराने बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारला. परंतु त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखलं. या घटनेच्या व्हिडिओवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. या व्हिडिओवरून काँग्रेसने सुनेत्रा पवार आमि धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. धनंजय मुंडे बीडचे हुकूमशहा? सुनेत्रा पवार, अजून किती दिवस ‘गुंगी गुडिया’ बनून राहतील, असं म्हणत टीका केली. परंतु गुंगी गुडिया हा शब्द अंजली दमानिया यांना खटकला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी