AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांचा अपघात झाला त्या कंपनीच्या विमानात पार्थ पवार बसलेच कसे? पैसा कोणाचा? अंजली दमानियांचा सवाल!

Parth Pawar : अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाशी संबंधित असलेल्या व्हीआरएस कंपनीच्या विमानातून पार्थ पवार यांनी प्रवास केला. यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अजित पवारांचा अपघात झाला त्या कंपनीच्या विमानात पार्थ पवार बसलेच कसे? पैसा कोणाचा? अंजली दमानियांचा सवाल!
Damania Image Credit source: Google
| Updated on: Apr 28, 2026 | 9:52 PM
Share

बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला होता. अपघात झालेले विमान हे VRS कंपनीच्या मालकीचे होते. अनेकांनी या अपघातावर संशय व्यक्त केला असून विमान कंपनीवरही शंका उपस्थित केला होती. या प्रकरणी सध्या तपास सुरू आहे. अशातच आता अजित पवार यांचे सुपुत्र आणि खासदार पार्थ पवार यांनी VRS कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचे समोर आले आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाल्या दमानिया?

पार्थ पवार यांच्या विमान प्रवासावर बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले की, ज्या VSR कंपनीच्या विमान अपघातात तीन महिन्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला, त्याच विमानात मुलगा जातो? त्या VSR कंपनी च्या चौकशीची मागणी करायचे सोडून, त्याच विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातो ?

सुनेत्रा पवारांचे OSD, राम चौबे आणि विकास पाटील, जे सरकारी अधिकारी आहेत आणि सरकारी पगार घेतात, ते पुन्हा एकदा पवारांच्या घरासाठी काम करत आहेत? मी पुन्हा एवढ्यासाठी म्हणत आहे कारण, हेच ते दोघे जे पुणे मुंढवा जमीन प्रकरणात पार्थच्या बाजूने उभे होते. तेव्हा अजित पवारांचे PA, आता सुनेत्रा पवारांचे. प्रश्न साधे आहेत, सरकारी अधिकारी खाजगी कामासाठी कसे जाऊ शकतात? चार्टर फ्लाइटचे पैसे कुणाच्या खिशातून? आणि VSR च्या त्याच विमानात पार्थ पवार बसले तरी कसे? उत्तरं जनतेला हवीत.

रोहित पवारांचा गंभीर आरोप

आज आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत खळबळजनक दावा केला आहे. अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान VSR कंपनीचे आहे, ज्याचे मालक व्ही के सिंग आहेत. याबाबत बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, ‘अजित दादांचा अपघात सकाळी झाला तेव्हा व्ही के सिंगला बक्षीस म्हणून 9 कोटी 81 लाख रुपये दिले, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे अजित दादांचा अंत्यविधी सुरू होता तेव्हा 16 कोटी 88 लाख रुपये दिले. आतापर्यंत 145 कोटी सिंग ला दिले आहेत.’

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच