हवा फक्त ओमराजेंचीच, जाता जाता उद्धव ठाकरेंना दिला आणखी एक मोठा धक्का, राजकारणात घडामोडींना वेग

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश आहे.

हवा फक्त ओमराजेंचीच, जाता जाता उद्धव ठाकरेंना दिला आणखी एक मोठा धक्का, राजकारणात घडामोडींना वेग
omraje nimbalkar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 18, 2026 | 7:07 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 9 खासदार निवडून आले होते. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर हे उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाला मिळालेलं पहिलचं मोठं यश होतं. परंतु आता या 9 पैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. हे सर्व खासदार आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा देखील होऊ शकते.

दरम्यान ज्या खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश आहे. ओमराजे निंबाळकर हे पक्ष सोडणार नाही असं अनेकांना वाटत होतं, मात्र ओमराजे यांनी सर्वांनाच अनापेक्षित असा धक्का दिला. त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. धाराशिव मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. दरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर आता मोठी बातमी समरो आली आहे.

ती म्हणजे जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये  आहेत.  जिल्ह्याचा विकास होत असेल तर आम्ही खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत आहोत. मात्र त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा असं आम्हाला वाटतं. परंतु त्यांनी जर आपला निर्णय मागे घेतला नाही तरी आम्ही त्यांच्यासोबतच कायम राहू अशा भावना तुळजापूर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आता धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात. हे सर्व पदाधिकारी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यात आहे. ओमराजे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यामुळे जिल्ह्यात सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे, या पार्श्वभूमीवर त्यांना सरकारकडून वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

Follow Us