मोठी बातमी! फडणवीसांनी गेम फिरवला, काँग्रेसला मोठा धक्का, घडामोडींना वेग

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असून, या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. आता पुन्हा एकदा ऐन निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! फडणवीसांनी गेम फिरवला, काँग्रेसला मोठा धक्का, घडामोडींना वेग
काँग्रेस
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2025 | 9:02 PM

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, दरम्यान त्यानंतर लगेचच राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला होता, या पराभवानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी महायुतीची वाट धरल्याचं पहायला मिळालं, दरम्यान अजूनही महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये प्रवेश सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

राज्यात सध्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. याच दरम्यान आज कोपरगावचे काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार पोटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी शहराध्यक्ष पदासह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला देखील धक्का बसला आहे. तुषार पोटे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कलविंदर दडीयाल यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान यावेळी भाजपच्या लोकशाही आघाडीच्या वतीनं शहर विकासाचा जाहिरनामा देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

भाजपमध्ये इनकमिंग सुरूच 

दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे, याचा सर्वात मोठा फटका हा भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला बसला आहे.  शिवसेना शिंदे गटातील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.