आणखी एक मोठा विमान अपघात टळला, दिल्लीहून -पुण्याला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानासोबत नेमकं काय घडलं?

आणखी एका विमानाचा मोठा अपघात टळला आहे. दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला शुक्रवारी पक्ष्यानं धडक दिली. त्यानंतर या विमानाची रिटर्न ट्रीप रद्द करण्यात आली आहे.

आणखी एक मोठा विमान अपघात टळला, दिल्लीहून -पुण्याला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानासोबत नेमकं काय घडलं?
AirIndia
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 20, 2025 | 4:34 PM

आणखी एका विमानाचा मोठा अपघात टळला आहे. दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला शुक्रवारी पक्ष्यानं धडक दिली. त्यानंतर या विमानाची रिटर्न ट्रीप रद्द करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना एअरलाइन्सच्या वतीनं सांगण्यात आलं की, हे विमान सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आलं आहे. विमान दिल्लीहून पुण्याला निघालं होतं, याचदरम्यान पक्ष्यानं विमानाला धडक दिली. जेव्हा या विमानाचं आगमन पुण्यात झालं, तेव्हा याबाबत माहिती मिळाल्याचं एअरलाइन्सनं म्हटलं आहे.

या घटनेबाबत माहिती देताना एअर इंडियानं म्हटलं आहे की, सध्या हे विमान पुणे विमानतळावरच आहे. या विमानाची रिटर्न ट्रीप रद्द करण्यात आली असून, सध्या इंजिनियरचं एक पथक या विमानाची सर्व बाजुनं तपासणी करत आहे. या विमानानं दिल्लीहून पुण्यासाठी उड्डाण केलं होतं, याच दरम्यान ही घटना घडली. जेव्हा हे विमान पुण्यात आलं तेव्हा, याबाबत माहिती मिळाली, त्यामुळे आता पुण्याहून दिल्लीला जाणारी फेरी रद्द करण्यात आली आहे.

प्रवाशांची व्यवस्था

या घटनेमुळे पुण्यात जे प्रवासी अडकले आहेत, त्यांच्या राहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, सोबतच त्यांना इतर सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या प्रवाशांना कॅन्सिलेशन किंवा पर्याय म्हणून रिशेड्यूलिंगची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या प्रवाशांना दिल्लीला नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती देखील एअर इंडियाच्या वतीनं देण्यात आली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघात घडला होता. लंडनला जाण्यासाठी अहमदाबादवरून विमानानं उड्डाण केलं, मात्र अवघ्या काही सेकंदांमध्ये या विमानाचा भीषण अपघात घडला. हे विमान मेडीकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं, या विमान अपघातामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. या विमानात असलेला केवळ एक प्रवाशी वाचला होता. दरम्यान त्यानंतर आता हा अपघात नेमका कसा झाला, याच्या कारणांचा शोध सुरू आहे. यादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.