मोठी बातमी! आणखी एका विमानाचा अपघात, टेक ऑफ करण्यापूर्वीच दुर्घटना

गेल्या काही वर्षांमध्ये विमानाच्या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा एक विमान अपघाताची घटना घडली आहे. सोलापूरमधून मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! आणखी एका विमानाचा अपघात, टेक ऑफ करण्यापूर्वीच दुर्घटना
Breaking News
| Updated on: Nov 12, 2026 | 3:13 PM

गेल्या काही वर्षांमध्ये विमानाच्या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. बारामती विमानतळावरच गेल्या काही दिवसांमध्ये दोन विमान अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यापूर्वी अहमदाबादमध्ये देखील भीषण विमान अपघात झाला होता. दरम्यान आता सोलापूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. सोलापूर विमातळावर विमानाचा अपघात झाला आहे. टेक ऑफ करण्यापूर्वीच विमान धावपट्टीवरून घसरलं आहे. सोलापूर विमानतळावर एका शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. शिकाऊ वैमानिक विमानाचे टेक ऑफ करत असतानाच विमान धावपट्टीवरून घसरल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर विमानतळावर हा अपघात झाला आहे. टेक ऑफ करण्यापूर्वीच विमान धावपट्टीवरून घसरलं आहे. शिकाऊ वैमानिक विमानाचे टेक ऑफ करत असतानाच विमान धावपट्टीवरून घसरल्याची माहिती समोर आली आहे.  विमान उड्डाण करत असतानाच ते धावपट्टीच्या खाली गेल्याने हा अपघात झाला आहे. सुदैवाने विमानातील शिकाऊ वैमानिक महिलेला कोणतीही हानी झालेली नाही.  दरम्यान सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून याबाबत अद्याप कोणती अधिक माहिती देण्यात आलेली नाहीये.

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us