मुंबईत रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीस मान्यता; किती रुपये जास्त द्यावे लागणार

ऑटोच्या बेसिक भाड्यात 2 रुपयांची भाडेवाढ झाली आहे. तर, टॅक्सीच्या भाड्यात देखील तीन रुपयांची भाडे वाढ झाली आहे

मुंबईत रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीस मान्यता; किती रुपये जास्त द्यावे लागणार
ऑटोरिक्षा, प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
| Updated on: Sep 27, 2022 | 10:37 PM

मुंबई : मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ झाली आहे. मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून (एमएमआरटीए) भाडेवाढीला मान्यता देण्यात आली आहे. ऑटोच्या बेसिक भाड्यात 2 रुपयांची भाडेवाढ झाली आहे. तर, टॅक्सीच्या भाड्यात देखील तीन रुपयांची भाडे वाढ झाली आहे.

नवीन दरानुसार रिक्षासाठी 23 रुपये मोजावे लागणार आहेत. टॅक्सीसाठी आता 28 रुपये मोजावे लागणार आहेत. तर कुल कॅबचे एसीचं प्रवासी भाडं 40 रुपये होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून ही नवीन भाडेवाढ लागू होणार आहे.

उदय सामंत (Uday Samant) यांची टॅक्सी असोसिएशन आणि रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक झाली होती. या बैठकीत रिक्षा, टॅ्सी चालकांनी भाडे वाढीचा प्रस्ताव मांडला होता.

सीएनजी दरवाढीमुळे महागाईच्या झळा बसत असल्याने भाडेवाढ करावी, अशी मागणी टॅक्सी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली होती. मागणी मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशाराही टॅक्सी चालकांनी दिला होता. याला रिक्षा चालक संघटनांनीही पाठिंबा दिला होता.

मात्र, टॅक्सी चालकांच्या मागण्यांबाबत शिंदे सरकारने सकारात्मक निर्णय दिला आहे. मुंबईत रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीस मान्यता मिळाली आहे.

मार्च महिन्यातच ऑटो रिक्षाचे भाडे तीन रुपयांनी वाढवण्यात आले होते. यावेळी रिक्षाचे भाडे 18 रुपयांहून 21 रुपयांवर गेले होते. यानंतर आता पुन्हा एकदा भाडे वाढ झाली आहे.

या भाडेवाढीचा फटका सर्वसमान्यांना बसणार आहे. मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे.