समीर वानखेडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, त्यांना गुजरातमध्ये पाठवा, अरविंद सावंतांचा घणाघात

20 ग्रॅम ड्रग्जचे प्रकरण 24 तास दाखवले जात आहे. गुजरातमध्ये हेरॉईन पकडण्यात आले. मात्र त्याच्यावर कारवाई झाली नाही. हा दुजाभाव नाही का ? एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना कारवाईसाठी गुजरातमध्ये पाठवले पाहिजे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केली.

समीर वानखेडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, त्यांना गुजरातमध्ये पाठवा, अरविंद सावंतांचा घणाघात
ARVIND SAWANT
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 11:55 PM

मुंबई : 20 ग्रॅम ड्रग्जचे प्रकरण 24 तास दाखवले जात आहे. गुजरातमध्ये हेरॉईन पकडण्यात आले. मात्र त्याच्यावर कारवाई झाली नाही. हा दुजाभाव नाही का ? एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना कारवाईसाठी गुजरातमध्ये पाठवले पाहिजे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र पडणवीस यांनाही लक्ष्य केलं.

समीर वानखेडे गुजरातमध्ये पाठवले पाहिजे

तुमची न्यायिक भूमिका नाही. यात दुजाभाव दिसतो. 20 ग्रॅम 22 ग्रॅम ड्रग्जचे प्रकरण 24 तास दाखवले जात आहे. गुजरातमध्ये हेरॉईन पकडण्यात आले. मात्र त्यावर कारवाई झाली नाही. हा दुजाभाव नाही का ? समीर वानखेडे यांना कारवाईसाठी गुजरातमध्ये पाठवले पाहिजे. मुंबई पोलिसांनी यावर सुमोटो दाखल केला पाहिजे. तसेच पंच प्रभाकरला पोलीस संरक्षण दिले पाहिजे,” असे अरविंद सावंत म्हणाले.

समीर वानखेडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत

तसेच पुढे बोलताना समीर वानखेडे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. त्यांनासुद्धा कायदा लागू होतो. खुलासे कशासाठी लागतात. तुम्ही निस्पृह आहात ना, त्यामुळे खुलासा करण्याची गरज नाही. केंद्र सरकारने जनाची मनाची सर्व सोडून दिली आहे. मुंबईमध्ये भरपूर कारवाया करण्यात आल्या. पण त्याच्या बातम्या आल्या नाही,” असा घणाघात सावंत यांनी केला.

भाजपवाले शेतकऱ्यांचा जीव घेत आहेत

पुढे बोलताना सावंत यांनी भाजप तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “माणसे रसातळाला जातील असं वाटलं नव्हतं. लबाड कोण आहे हे जनतेला माहिती आहे. कांद्याचे भाव कमी झालेले नाहीत. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी झाले नाहीत. याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला पाहिजे. लोकांना मूर्ख बनवू नका. भाजपवाले शेतकऱ्यांचा जीव घेत आहेत. त्यांची कीव येते, अशी खोचक टीका” सावंत यांनी केली.

मलिकांचा आरोप आणि नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडेंच्या जन्माच्या दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद आहे. त्यांचा धर्म मुस्लिम आहे. त्या दाखल्यावर खोडखोड केलीय. हा दाखला खोटा असेल तर खरा दाखला कोणता आहे? त्यांनी समोर आणावा. समीर वानखेडेच्या वडिलांनी धर्मांतर केलं. दोन मुलं जन्माला आली. त्यांचे जन्माचे दाखले आले आणि त्यांनतर वडिलांनी धर्मांतर लपून ठेवलं. नोकरी केली तिथे कोणताही पुरावा दिला नाही, असं मलिक यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसात धर्माच्या आड घेऊन प्रचार सुरू झाला होता. पण लोकांना माहीत नव्हतं हा व्यक्ती जन्मापासून आजपर्यंत मुस्लिम आहे. ते तपासात पुढे येईल, असं मलिक यांनी म्हटलंय.

इतर बातम्या :

Sameer Wankhede Photo: पहिलं लग्न ते धर्मांतर, खंडणी, अपहरण ते चौकशी… समीर वानखेडेंवरील आरोप आणि प्रत्यारोप!

इथे ओशाळली माया, 12 वर्षाच्या लेकीने वडिलांसोबत असं का केलं? संपूर्ण जग हळहळलं

India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ

(arvind sawant criticizes sameer wankhede and bjp on aryan khan drugs case)