महिला प्रेग्नंट होऊ नये म्हणून… लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणात खळबळजनक अपडेट

अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. तो महिला प्रेग्नंट होऊ नये म्हणून विशेष प्रकारच्या गोळ्या किंवा औषधे देत होता का? याचा तपास सुरु आहे.

| Updated on: Mar 31, 2026 | 3:28 PM
1 / 5
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात एक धक्कादायक आणि गंभीर वळण आले आहे. या प्रकरणातील तपास अधिकाधिक गहन होत असताना, नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2 / 5

सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अशोक खरात यांच्याकडून महिलांना गर्भधारणा टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने विशेष प्रकारच्या गोळ्या किंवा औषधे दिली जात होती का? याबाबत गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय, महिलांना संमोहित करण्यासाठी किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध नियंत्रण ठेवण्यासाठी देखील काही प्रकारची औषधे किंवा मेडिसिनचा वापर केला जात होता का? असा आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

3 / 5

स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT) सध्या या सर्व पैलूंचा सखोल तपास करत आहे. सूत्रांच्या मते, SIT च्या तपासात आणखी काही गंभीर आणि धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे आणि गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत.

4 / 5

या प्रकरणात डॉक्टरांच्या संभाव्य सहभागामुळे नाशिकच्या वैद्यकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. SIT ने याबाबत अधिक माहिती अद्याप जाहीर केलेली नाही, मात्र तपासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

5 / 5

अशोक खरातला 1 एप्रिल पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. आणखी काही माहिती समोर येते का हे पाह्यासाठी सर्व आतुर आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us