AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदू खरात प्रकरण भोवलं, बड्या पदावरील व्यक्तीचा राजीनामा, नेमका आरोप काय?

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात एका बड्या व्यक्तीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

भोंदू खरात प्रकरण भोवलं, बड्या पदावरील व्यक्तीचा राजीनामा, नेमका आरोप काय?
Kaka KoyateImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 23, 2026 | 5:18 PM
Share

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातची वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सखोल चौकशी सुरू आहे. याआधी अनेक नेते आणि महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती अशोक खरातच्या संपर्कात होते अशी माहिती समोर आलेली आहे. महिलांचे लैंगिक शोषण करण्यासह अशोक खरातने भोंदुगिरी आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. अशातच आता एका बड्या व्यक्तीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काका कोयटे यांचा राजीनामा

समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काका कोयटे फेडरेशनचे अध्यक्ष होते, मात्र काही दिवसांपूर्वी भोंदू अशोक खरात याचे समता पतसंस्थेशी कनेक्शन समोर आल्यानंतर सभासदांकडून राजीनाम्याची मागणी करण्यात आल्याची चर्चा समोर आली होती, त्यानंतर आता त्यांनी आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य पतसंस्था फेडरेशच्या अंतर्गत राज्यातील 15 हजार पतसंस्था काम करतात. 6 हजार सभासद असलेल्या या फेडशनचे कोयटे 2015 च्या पूर्वीपासून अध्यक्ष होते. मात्र काही दिवसांपूर्वी अशोक खरात आणि समता परिषदेचे संबंध असल्याचे समोर आले होते, त्यामुळे त्यांच्यावरील दबाव वाढला होता, त्यामुळेच आता काका कोयटे पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून पायऊतार झाले आहेत.

मी खरातचा भक्त नाही – काका कोयटे

समता पतसंस्थेत अशोक खरात तब्बल 100 खात्यांना नॉमिनी असल्याचे समोर आले होते, या खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचे समोर आले होते. तसेच काका हे खरातचे भक्त असल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी बोलताना काका कोयटे यांनी म्हटले होते की, मी भोंदू खरातचा भक्त नाही, कोणत्याही भोंदूशी माझा संबंध नाही. नाशिकच्या पतसंस्था फेडरेशनच्या कार्यक्रमात खरात होता एवढच. समता पतसंस्थेमध्ये भोंदू अशोक खरात नॉमीनी असलेल्या खात्यांची केवायसी करूनच ते उघडण्यात आले. जास्त खाती कोविड काळात ऑनलाईन उघडण्यात आली होती. जे खातेदार म्हणतायत आमचा संबंध नाही त्याचे पुरावे पोलिसांना देऊ असं स्पष्टीकरण काका कोयटे यांनी दिले आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच