
महिलांच्या लैंगिक शोषणाचा, त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या भोंदू अशोख खरात (Ashok Kharat) प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली असून या केसमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. अनेक राजकारणी, नेते, सेलिब्रिटी हे खरातला भेटायला यायचे अशी माहितीदेखील समोर आली होती. यामध्ये रुपाली चाकणकर, दीपक केसरकर यांचं नाव आत्तापर्यंत अनेकवेळा समोर आलं असून चाकणकरांना तर राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला. आता याप्रकरणात एक नवी अपडेट समोर आली असून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती, शिवेसान (शिंदे गट) नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
नीलम गोऱ्हे या अशोक खरातला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. कोरोनापूर्वी त्यांनी खरातची भेट घेतली होती. एवढंच नव्हे तर खरातने नीलम गोऱ्हेंचं भविष्य सांगितलं होतं, आमदारकीसाठी गोऱ्हे या खरातल्या भेटल्या असा आरोप देसाई यांनी केला आहे. कदाचित गोऱ्हे यांना खरातच्या काळ्या कारवायांची माहिती नसेल, पण आता अनेक महिलांनी खरातची गैरकृत्य सांगितल्यानंतर, गोऱ्हे यांनी खरातविरोधात आवाज का उठवला नाही?, आपल्या भेटीची माहिती त्यांनी का दिली नाही?, असा सवालही देसाई यांनी विचारला.
काय म्हणाल्या तृप्ती देसाई ?
मंत्रीपद मिळावं, ते भविष्य बघण्यासाठीसुद्धा कॉलेजरोडच्या खरातच्या ऑफीसमध्ये नीलम गोऱ्हे या पोहोचलेल्या होत्या. नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याला एक्स्प्रेस इन नावाचं जे हॉटेल आहे , (कोरोनाच्या काळाच्या आधी) तिथे नीलम गोऱ्हे मुक्कामाला होत्या. त्यावेळी अशोक खरात हा एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये नीलम गोऱ्हे यांना त्यांचं भविष्य सांगण्यासाठी भेटायला गेलेला होता. हे प्रकरण बाहेर आल्यापासून अनेक जण या प्रकरणात बोलत नव्हते, त्यात सर्वात महत्वाचा चेहरा होता तो नीलमताई गोऱ्हेंचा. कारण नीलम गोऱ्हेंना आपण पाहिलं आहे, अगदी छोटी प्रकरणी असली तरी त्याबद्दल प्रेस नोट काढण, त्यावर जाहीरपणे त्या बोलत असता. पण आता अख्खं अधिवशेन झालं, तिथे त्या उपसभापती म्हणून आहेत. महिलांच्या लैंगिक शोषणा मुद्दा आला की नीलमताई या पाडितेला भेटायला जातात. पण इथे 150 हून अधिक व्हिडीओ पोलिसांकडे आले, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली, तेजस्वीनी सातपुते या महिला अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. तरीही एक महिला नेतच्या म्हणून, जबाबदारीचं पद (विधानपरिषदेच्या उपसभापती) आहे, या खरात प्रकरणात नीलम गोऱ्हे आत्तापर्यंत काहीच बोलल्या नाहीत, ते का असा सवाल तृप्तची देसाई यांनी विचारला.
नीलम गोऱ्हेंसोबतच्या व्यक्तीनेच दिली माहिती
याचं कारण म्हणजे अशोक खरातचं संबंध हा नीलम गोऱ्हे यांच्याशी आहे. नीलम गोऱ्हे या खरातला भविष्य दाखवायला जायच्या. ज्या भेटी मी सांगितल्या, त्या भेटींमध्ये नीलम गोऱ्हे यांच्यासोबत जी व्यक्ती तिथे उपस्थित होती, त्यांनीच मला ही माहिती पुण्यामध्ये येऊन दिली आहे, असा मोठा खुलासा तृप्ती देसाई यांनी केला.
नीलम गोऱ्हे या स्पष्टवक्त्या आहेत, जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं, तेव्हा त्यांनी हे सगळं सांगायला हवं होतं, यासंदर्भात आवाज उठवायला हवा होता. अशोक खरात जरी त्यांच्या परिचयाचा असला तरी या प्रकरणात आता मी आवजा उठवणार अशी भूमिका नीलम गोऱ्हे यांची असायला हवी होती असंही तृप्ती देसाई म्हणाल्या. सगळं समोर आल्यावरही नीलम ताई शांत बसलेल्या आहेत, आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशी टीकाही देसाई यांनी केली.