AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi : भारत देश 2047 सालापर्यंत विकसित होणारच; लाल किल्ल्यावरून PM नरेंद्र मोदी कडाडले, वाचला विकासाचा पाढा

लाल किल्ल्यावरून PM नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. त्यावेळी भारताचा विकास करणारच असा निश्चय व्यक्त केला.

Narendra Modi : भारत देश 2047 सालापर्यंत विकसित होणारच; लाल किल्ल्यावरून PM नरेंद्र मोदी कडाडले, वाचला विकासाचा पाढा
| Updated on: Aug 15, 2026 | 8:36 AM
Share

देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशाची राजधानी दिल्लीतही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 व्यांदा भारतीयांना संबोधित केलं. भारताचं राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ला 150 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून मोठा उत्साहात आजचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर 2047 पर्यंत भारत विकसित होणारच, असा निश्चय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांनी यंदा 13 व्यांदा ध्वजारोहण केलं. त्यानंतर लाल किल्लावरून देशातील जनतेला संबोधित करताना म्हटलं की, आज घराघरात तिरंगा आहे. प्रत्येक मनात तिरंगा आहे. मोठ्या उत्साहात नवीन संकल्प घेऊन देश पुढे जात आहे. तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.  आज महापुरुषांचं स्मरण करूया. ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य पणाला लावलं. अशा महान क्रांतिकारकांना नमन करतो’.

‘देश 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. मागील काही दिवसांपासून देशाच्या काही भागात पूरस्थिती होती. भूस्खलन झालं. अनेक कुटुंबाना फटका बसला. मी पीडित कुटुंबांना विश्वास देतो की, संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. कोणताही देश जेव्हा महान होतो, तेव्हा स्वप्न, संकल्प, सामर्थ्याच्या बळावर पुढे जातो.  छोटे स्वप्न नव्हे, तर मोठं स्वप्न, लक्ष्य ठेवल्यास विचार विकसित होतात. आपले संकल्प दृढ असले पाहिजे. आपले संकल्प देखील मोठे असले पाहिजे. त्यामुळे आपण प्रयत्न जास्त करतो. त्यामुळे स्वप्न साकार होण्यास मदत होते. आमचंही एक स्वप्न आहे.  2047 वर्ष येईल, त्यावेळी देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील. तेव्हा देशाचा विकास करूनच दाखवू. सर्वात अधिक लोकसंख्या असलेला देश विकसित होण्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवतो. त्यावेळी त्याच्या साहसाची जोरदार चर्चा होते’, असे मोदी यांनी पुढे सांगितले.

‘मी वाऱ्यावर बोलत नाही. मी मागील 12 वर्षांत सर्व घटकातील लोकांनी  संकल्पासोबत देशाचा विकास करण्यास मदत केली. फार कमी वेळेत गरीबीतून बाहेर आले. 12 वर्षांत भारताचा सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत समावेश झाला. सुरुवातीला देशाचा विकास जास्त वेगात झाला नाही. मागील 12 वर्षांत जलदगतीने देश पुढे जात आहे. 140 कोटी जनतेला केलेल्या संकल्पाला रोखणे आता अवघड आहे. मागील 12 वर्षांत संरक्षण उत्पादन 4 पटीने वाढलं. खादी आणि ग्रामोद्योग 5 पटीने वाढलं. इलेक्ट्रॉनिक उत्पादन 7 पटीने वाढलं. आधुनिक रेल्वे कोचचं काम 21 पट वाढलं. मोबाइल उत्पादन 31 पट वाढलं. डिजिटलच्या युगातही मोठं कार्य केलं आहे. इंटरनेट युजर्स 4 पटीने वाढले आहेत. पेटंट ग्रँट देखील 4 पटीने वाढले. डिजिटल ट्रान्झेक्शन 100 पटीने वाढले, अशी आकडेवारी मोदींनी दिली.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप