
भोंदुबाबाब अशोक खरात प्रकरणामुळे राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या भोंदुबाबाने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या कृत्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. विशेष म्हणजे या भोंदुबाबाचे सत्ताधारी पक्षांतील अनेक नेत्यांसोबत फोटो असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात एका महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर अखात याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या खरात पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, या प्रकरणात अनेक खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. असे असतानाच आता याच शोषण कांडामध्ये हादरवून टाकणारा नवा चेहरा समोर आला आहे. या प्रकरणातील नीरज जाधवचा चेहरा समोर आला आहे.
कॅप्टन फाईल्स प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून नीरज जाधव कोण होता, असे विचारले जात होते. या नीरज जाधवला पोलिसांनी अटक केली आहे. आता त्याचा फोटो शेवटी समोर आला आहे. नीरज जाधवचा खरा चेहरा समोर आला आहे. हा नीरज जाधव कॅप्टन अशोक खरात याच्या कार्यालयात होता. तो तिथे ऑफिस बॉय म्हणून कार्यरत होता. खरात महिलांचे लैंगिक शोषण करायचा त्यावेळी हाच नीरज जाधव व्हिडीओ रेकॉर्ड करायचा, असा आरोप केला जातोय. त्याने 100 पेक्षा अधिक लैंगिक शोषणाचे व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा दावा केला जातोय. त्याचाच फोटो आता समोर आला आहे.
नीरज जाधव हा अशोक खरातच्या कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम करायचा. पोलिसांनी संशय बळावल्यामुळे नीरज जाधवलाही अटक केले आहे. त्याच्याकडेच अशोक खरातचे लैंगिक शोषणाचे व्हिडीओ सापडलेले आहेत. त्याला ताब्यात घेतल्याने आता अनेक मोठ्या गोष्टींचा खळबळजनक खुलासा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दुसरीकडे अशोक खरात हादेखील पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचीही कसून चौकशी केली जात आहे. अशोक खरातचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. तो या व्हिडीओमध्ये अल्पवयीन मुलीच्या पोटावर काहीतरी लावत असल्याचे दिसत आहे. तर त्याच्या समोर एक महिला बसलेली आहे. खरातचे हे व्हिडीओ समोर आल्याने महाराष्ट्राच्या राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.