AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat : पेढा, खारट- कडवट पाणी आणि लागलीच स्पर्श… लिंगपिसाट अशोक खरातच्या शोषणाचा पॅटर्न उघड

स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरातच्या लैंगिक शोषण प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला आहे. महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याला अटक झाली असून, अश्लील व्हिडीओ असलेले पेनड्राइव्ह जप्त झाले आहेत. 'मी कृष्णाचा अवतार' असे सांगत महिलांचे लैंगिक शोषण करण्याचा त्याचा धक्कादायक पॅटर्न समोर आला. कोट्यवधींच्या बेनामी मालमत्तांचाही तपास सुरू असून, या भोंदूबाबाच्या कृत्यांमुळे राज्य सुन्न झाले आहे.

Ashok Kharat : पेढा, खारट- कडवट पाणी आणि लागलीच स्पर्श... लिंगपिसाट अशोक खरातच्या शोषणाचा पॅटर्न उघड
अशोक खरातबद्दल धक्कादायक खुलासे
| Updated on: Mar 20, 2026 | 3:38 PM
Share

स्वत:ला ज्योतिषी, अंकशास्त्रज्ञ म्हणवणारा , लोकांचं भविष्य सांगण्याचा दावा करणारा स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याच्या कारनाम्यांनी अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. त्याच्या एकेक कृत्यांची चर्चा फक्त संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरात सुरू आहे. त्याच्या सेक्स स्कँडलने लोकं अगदी हादरली आहे. थोरमोठे नेते, राजकारणी, सेलिब्रिटी यांची त्याच्याकडे ऊठबस असायची. महिलेवर अत्याचाराच्या आरोपाखील बुधवारी सकाळी त्याला अटक जाली आणि त्याच्या घरात, ऑफीसमध्ये छापे मारले. त्याच्या अटकेनंतर सापडलेल्या पेनड्राइव्हमध्ये कित्येक अश्लील व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने खरात याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

दरम्यान याप्रकरणाचा तपास जसजसा पुढ सरकत आहे, तसतशी लिंगपिसाट खरातच्या कारनाम्यांची धक्कादायक माहिती उघड होत चालली आहे. त्याने कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘ओकस प्रॉपर्टीज’ या त्याच्या कार्यालयात अनेक महिलांना टार्गेट करत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा संशय आहे.

खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न उघड

तपासादरम्यान खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर आला आहे. त्याच्याकडे ज्या महिला यायच्या त्यांना तो कस भुलवायचा, त्यांचं शोषण कसं करायचा याचा उल्लेख FIR मध्ये असून त्यातूनच काही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

‘ मी कृष्णाचा अवतार, तू मागच्या जन्मातील माझी राधा ‘, कार्यालयात आलेल्या महिलेच्या डोक्यावर तांब्या-लोटा ठेऊन कॅप्टन खरात कानाजवळ हे शब्द पुटपुटायचा. त्या महिलेसोबत जी व्यक्ती यायची, त्यांना ध्यानस्थ पूजेच्या नावाखाली कॅबिन बाहेर बसवून ठेवायचा. खरात हा त्या महिलांना खायला पेढा द्यायचा आणि कडवट – खारट चव असलेलं पाणी त्यांना प्यायला द्यायचा. त्यानंतर तो पीडित महिलांना गायत्री मंत्री म्हणायला लावायचा आणि लागलीच स्पर्श करायला सुरुवात करायचा. आणि त्यानंतर महिलांना गुंगी आली की त्यांचं लैंगिक शोषण सुरू करायचा. कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा हा पॅटर्न होता, अशी माहिती आता समोर आली आहे.

सध्या खरात हा नाशिक पोलिसांच्या ताब्यात असून 100 हुन अधिक लैंगिक शोषणाचे सीसीटीव्ही फुटेज असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

खरातच्या नावावर आणखी एक मालमत्ता उघड

दरम्यान लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी कॅप्टन खरातबद्दल नवा खुलासा झाला आहे. भोंदू बाबा अशोक खरात याच्या नावावर शिर्डीत आणखी एक मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. 50 कोटींच्या जमिनीपाठोपाठ 5कोटींची आणखी जमीन समोर आली असून ही मालमत्ता पत्नीच्या नावे खरेदी केल्याचा आरोप आहे. शिर्डीत उद्योग,हॉटेल-लॉन्समध्ये निनावी भागीदारीची चर्चा आहे. ‘भोंदूबाबा’ खरातच्या संपत्तीचा वाढता आकडा समोर आला असून कोट्यवधींच्या मालमत्तेमुळे तपासाचा वेग वाढणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आर्थिक व्यवहारांवरही चौकशी होण्याची शक्यता आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!