AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला डॉक्टरला मारहाण करणं भोवलं, नगरसेवक रमेश म्हात्रे यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी

डोंबिवलीतील महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रमेश म्हात्रे यांना आता 4 दिवस म्हणजे 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

महिला डॉक्टरला मारहाण करणं भोवलं, नगरसेवक रमेश म्हात्रे यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी
Ramesh mhatareImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 10, 2026 | 4:33 PM
Share

डोंबिवलीतील महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रमेश म्हात्रे यांना आता 4 दिवस म्हणजे 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली, यावेळी रमेश म्हात्रे यांच्यासह इतर तीन आरोपी हजर होते. या तिघांनाही 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्याण न्यायालयात पार पडली सुनावणी

डोंबिवली महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी कल्याण सत्र न्यायालयात सुनावनी पार पडली. आरोपी रमेश म्हात्रेंसह इतर तीन आरोपींच्या उपस्थितीत कल्याण न्यायालयातील कोर्ट हॉल 6 मध्ये न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग सरन्यायाधीश श्रीमती के एस कातकडे यांच्या दालनात युक्तिवाद पार पडला. आरोपी रमेश म्हात्रे यांचे वकील आनंद पथकी आणि सरकारी वकील आनंद आढसकर यांच्यात युक्तिवाद झाला दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकूण घेतल्यानंतर के एस कातकडे यांनी म्हात्रे यांच्यासह इतर 3 आरोपींना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोर्टाबाहेर गोंधळ

आज रमेश म्हात्रेला न्यायलयात हजर करताच कोर्टाबाहेर गोंधळ झाला. रमेश म्हात्रे सोबतच्या एका आरोपीवर असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याची प्रत घेऊन फिर्यादीचा नातेवाईक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. गुन्ह्याची प्रत घेऊन आतमध्ये सोडण्याची मागणी फिर्यादीच्या नातेवाईकांनी केली. आरोपी विरोधात असलेला विनयभंगाच्या गुन्ह्याची माहिती दंडाधिकाऱ्यांला देण्यासाठी आत सोडा अशी मागणी नातेवाईकांनी केली. मात्र यावेळी बाहेर पोलिस आणि नातेवाईक यांच्यात बाचाबाची झाली.

रमेश म्हात्रेंवर पक्षांतर्गत कारवाई होणार?

दरम्यान, न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कोठ़डडी सुनावल्यानंतर आता रमेश म्हात्रेंवर आता पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. कारण रमेश म्हात्रे यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. डॅाक्टर मारहाण प्रकरणी तुमच्या पक्षाने कारवाई का करु नये? अशी विचारणा रमेश म्हात्रे यांना पक्षाकडून करण्यात आली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. आता एकनाथ शिंदे म्हात्रे यांचा राजीनामा घेतात का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ