AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगरसेवक रमेश म्हात्रेंचा पाय आणखी खोलात; रुग्णालयातून थेट न्यायालयात हजर करणार, काँग्रेस नगरसेविकेनेही केली मोठी मागणी

Dombivli hospital row : डोंबिवली डॉक्टर प्रकरणात आज शुक्रवारी रमेश म्हात्रे यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.

नगरसेवक रमेश म्हात्रेंचा पाय आणखी खोलात; रुग्णालयातून थेट न्यायालयात हजर करणार, काँग्रेस नगरसेविकेनेही केली मोठी मागणी
| Updated on: Jul 10, 2026 | 12:51 PM
Share

डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणातील शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याबाबत महत्त्वाची माहिती हाती आली आहे. ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या म्हात्रेंना डिस्चार्ज मिळालाय. त्यांना कल्याण न्यायालयाने बुधवारी फिटनेस सर्टिफिकेट मागितलं होतं. त्यानंतर त्यांना आज शुक्रवारी डिस्चार्ज मिळालाय. त्यानंतर रमेश म्हात्रेंना आज शुक्रवारी अडीच वाजता कल्याण कोर्टात हजर केलं जाणार आहे. याचदरम्यान नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या हिंसक वागणुकीवरून काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी संताप व्यक्त केला आहे. रमेश म्हात्रेंसारख्या नगरसेवकासोबत सभागृहात बसायला लाज वाटते, अशी भावना कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

रमेश म्हात्रे यांना बुधवारी अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास झाल्याने ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याची विनंती केली होती. मात्र न्यायालयाने आरोपीची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले. रमेश म्हात्रे न्यायालयात हजर होईपर्यंत पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीचा आदेश देणार नसल्याचे न्यायालयाने पोलिसांना सांगितले होते. मारहाण प्रकरणातील इतर तीन आरोपींची दोन दिवसांची पोलीस कोठडी आज शुक्रवारी संपत आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील आरोपी असलेल्या चौघांची पोलीस कोठडी वाढवली जाणार की न्यायालयीन कोठडी सुनावली जाणार, तसेच तपासासाठी आणखी कोणती माहिती आणि पुरावे आवश्यक आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

रमेश म्हात्रेंना निलंबित करा, नगरसेविका कांचन कुलकर्णी यांची मागणी

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या हिंसक वागणुकीवरून काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी संताप व्यक्त केला आहे. ज्या माणसाने महिला डॉक्टरवर हात उचलला आहे. त्या माणासाची प्रतिमाच ही ठिकठिकाणी मारामारी करण्याची आहे. या लोकांसोबत सभागृहात बसायला भीती वाटत आहे’.

‘सत्ताधारी उपमुख्यमंत्री शिंदे लाडकी बहीण योजना चालवत आहेत. त्याच सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी महिलांना मारहाण करत आहेत. हीच का लाडक्या बहि‍णींची परतफेड आहे का? असा सवाल त्यांनी केला. ‘एखाद्या गरीब माणसाला अटक केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये ठेवलं जातं का.. मला या नगरसेवकासोबत महासभेत बसायची देखील भीती वाटत आहे. महिलांना मारहाण करणारे आमच्या सभागृहात आहेत. मी मागणी करते की, या नगरसेवकाला बडतर्फ केले पाहिजे. त्याचं निलंबन केलं पाहिजे. असे व्यक्ती लोकप्रतिनिधीच्या पात्रतेचे नाहीत, असेही त्यांनी पुढे म्हटले.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ